Lumpy Skin Agrowon
ताज्या बातम्या

Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’च्या संसर्गात झपाट्याने वाढ

आजपर्यंत शंभर जनावरांना या रोगाची बाधा झाली आहे. रविवारी (ता. २५) संपूर्ण जिल्हाभर ५९ हजार ८७० जनावरांचे लसीकरण करण्यात आले. आजवर जिल्ह्यात दोन लाख एक हजार ६१५ जनावरांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

टीम ॲग्रोवन

नांदेड : जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’ (Lumpy SKin Disease)चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आजपर्यंत शंभर जनावरांना या रोगाची बाधा झाली आहे. रविवारी (ता. २५) संपूर्ण जिल्हाभर ५९ हजार ८७० जनावरांचे लसीकरण (Lumpy Vaccination)करण्यात आले.

आजवर जिल्ह्यात दोन लाख एक हजार ६१५ जनावरांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. लम्पी स्कीन हा आजार गोठ्यातील अस्वच्छता, पशुधनाच्या अंगावरील गोचिड व इतर किटकांमुळे होण्याचा संभव अधिक असतो. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामपातळीवर जाऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.

सद्यःस्थितीत नांदेड जिल्ह्यातील २१ गावे लम्पी स्कीन बाधित आहेत. या २१ गावात १० हजार २६६ जनावरांची संख्या आहे. यातील १०० बाधित जनावरांना वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बाधित गावाच्या पाच किलो मीटर परिघातील गावांची संख्या १४१ आहे.

बाधित २१ गावांच्या पाच किलो मीटर परिघातील १६२ गावात ५९ हजार १३८ पशुधन आहे. ‘लम्पी स्कीन’मुळे मृत पशुधनाची संख्या पाचवर पोचली आहे. आजपर्यंत दोन लाख ६० हजार जनावरांना लस देण्यात आली आहे.

पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या पशूची स्वच्छता, गोठ्यातील स्वच्छता व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT