Siddheshwar Sugar Factory Agrowon
ताज्या बातम्या

Siddheshwar Factory : सिद्धेश्वर बचाव’साठी ट्रॅक्टर, बैलगाड्यांसह मोर्चा

नियोजित बोरामणी विमानतळावरून विमानसेवा सुरू करावी, या मागणीसाठी कारखान्याच्या सभासद शेतकरी, कामगारांनी सोलापुरात सोमवारी (ता. १९) रस्त्यावर उतरत ट्रॅक्टर, बैलगाड्यांसह मोर्चा काढून लक्ष वेधले.

Team Agrowon


सोलापूर ः सोलापुरातील विमानतळावरून विमानाच्या उड्डाणासाठी श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज प्रकल्पाची चिमणी आडवी येत असल्याने ती चिमणी पाडण्याचा दिलेला आदेश थांबवावा आणि कारखाना वाचवावा, तसेच नियोजित बोरामणी विमानतळावरून विमानसेवा सुरू करावी, या मागणीसाठी कारखान्याच्या सभासद शेतकरी, कामगारांनी सोलापुरात सोमवारी (ता. १९) रस्त्यावर उतरत ट्रॅक्टर, बैलगाड्यांसह मोर्चा काढून लक्ष वेधले.

सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. कुमठ्यानजीकच्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यापासून निघालेल्या या मोर्चात शंभराहून अधिक ट्रॅक्टर आणि ५० बैलगाड्यांसह शेतकरीही सहभागी झाले. होम मैदानावर त्याचा समारोप झाला. सिद्धेश्वर कारखान्याच्या सहवीज प्रकल्पाची चिमणी विमान उड्डाणाला अडथळा ठरत असल्याचा अहवाल डीजीसीएने दिलेला होता. त्यानंतर ही चिमणी पाडून विमानसेवा सुरू करावी, अशी भूमिका सोलापूर विकास मंच आणि सोलापूर विचार मंचने घेतली. हरित लवादाने कारखान्याला क्लोजर नोटीस पाठवलीय.

गाळप हंगाम सुरू असताना चिमणीचा वाद पुढे करून किंवा क्लोजर नोटीस पाठवून यामध्ये कारखाना बंद पाडण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप कृती समितीच्या वतीने संचालक श्री. काडादी यांनी केला आहे. होटगी रोड विमानतळाचा ‘उडान योजने’मध्ये समावेश होऊनही विमानसेवा सुरू झालेली नाही. पण होटगी रोडऐवजी बोरामणी रोडवरील नियोजित विमानतळ सुरू करावे, ही आमची मागणी आहे. या आंदोलनातून कारखाना वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, असेही काडादी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT