Raju Shetti Eknath Shinde
Raju Shetti Eknath Shinde Agrowon
ताज्या बातम्या

Raju Shetti : 'एकनाथांच्या राज्यात शेतकरी अनाथ' ; राजु शेट्टींची टीका

Team Agrowon

Agriculture News गेल्या दोन दिवसांत राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. राज्यात अवकाळीची परिस्थिती असताना मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाचे आमदार अयोध्या दौऱ्यावर होते.

यावर रामराज्य आणयचं असेल, तर आपल्या प्रजेला अडचणीत टाकून चालणार नाही, असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.

'एकनाथांच्या राज्यात माझा शेतकरी अनाथ होवू नये एवढीच अपेक्षा' असे म्हणत शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यात फळबागांसह इतर शेतमालांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंरतु शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी सरकार अयोध्याची वारी करत आहे.

संकटाच्या काळात शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची अपेक्षा होती. मात्र, सरकारमधील मंत्र्यांसह मुख्यमंत्री अयोध्येच्या दौऱ्यावर गेल्याने शेट्टी यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

शेट्टी म्हणाले की, अवकाळीमुळे राज्यात द्राक्ष, पेरू, कांद्यासह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे शेतकरी आपलं पीक जपतो. पण निसर्गाच्या एका फटक्याने होत्याचं नव्हतं होतं. अशा अवस्थेत एकनाथांच्या राज्यामध्ये शेतकरी झाला आहे.

मुख्यमंत्री साहेब तुम्हाला प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायचं असेल, तर खुशाल घ्या. ती तुमची व्यक्तिगत बाब आहे.

परंतु, राज्याच्या प्रमुखाला व्यक्तिगत बाबींपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतात. आणि कर्तव्याकडे लक्ष देणं गरजेचं असंत. राज्यातील शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू नका, असेही शेट्टी म्हणाले आहेत.

ज्या प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला आपण गेलेले आहात, त्या प्रभू रामचंद्राने प्रजेला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं म्हणून आजही जनता म्हणते रामाचं राज्य आलं पाहिजे.

तुमच्या राज्यात जर रामाचं राज्य निर्माण करायचं असेल, तर या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात द्या, एवढीच कळकळीची विनंती, असंही शेट्टी यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loksabha Election 2024 : शिर्डीतल्या तिरंगी लढतीकडे लागले राज्याचे लक्ष

Unauthorized Seed Stock : एक लाख रुपयांचा अनधिकृत बियाणे साठा जप्त

Pre Monsoon Rain : वादळी वाऱ्यासह पावसामुळे दाणादाण

Millet Crop : भरडधान्याची पिके वाढून विकास होईल; नांदेड येथे मराठवाड्यातील भरडधान्य पिक परिषदेत तज्ज्ञांचा आशावाद

Fodder Production : चारा पिकांच्या क्षेत्रात तीन हजार हेक्टरने वाढ

SCROLL FOR NEXT