Crop Damage : पावसामुळे ज्वारी, बाजरी, गहू, भाजीपाल्याचे नुकसान

पुणे जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शनिवार (ता. ८) आणि रविवार (ता.९) अशा सलग दोन दिवसांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसला आहे.
Crop Damage
Crop Damage Agrowon

Crop Damage Pune News जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शनिवार (ता. ८) आणि रविवार (ता.९) अशा सलग दोन दिवसांत अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपिटीचा (Hailstorm) मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे ज्वारी, बाजरी, गहू, भाजीपाला पिकांसह फळबागांना (Crop Damage) फटका बसला आहे.

कैऱ्यांसह मोहोर गळाल्याने आंबा पिकाला देखील मोठा फटका बसला आहे. चास (ता. खेड) येथे वीज पडून राम गंगाराम काळे (वय ७०) या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील पहाडदरा परिसराला रविवारी (ता.९) सायंकाळी मुसळधार पावसासह गारपिटीचा मोठा तडाखा बसला असून रस्ते शेतात, गोठ्यात, घराच्या अंगणात गारांचा अक्षरशः खच पडला होता. गारांच्या माऱ्याने शेतातील कांदा, उन्हाळी बाजरी, मका, गहू जनावरांचा हिरवा चारा भुईसपाट झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Crop Damage
Hailstorm Crop Damage : विदर्भात गारपिटीचा पिकांना मोठा फटका

रविवारी (ता.९) सायंकाळी साडेचार पाच वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच मोठ्या गारा पडू लागल्या,

तसेच गारांचा खच तयार झाला. या भागातील शेतकरी नगदी पीक म्हणून कांदा पीक घेतात. आधीच बाजारभाव नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे,

त्यातच रविवारी पडलेल्या गारांमुळे शेतात काढून ठेवलेला कांदा भिजून नुकसान झाले, तर शेतातील उन्हाळी बाजरी, मका, गहू जनावरांचा हिरवा चारा शेतात आडवा होऊन भुईसपाट झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष भगवान वाघ, अजय कुरकुटे, सोसायटी अध्यक्ष मच्छिंद्र वाघ, संतोष कुरकुटे, पप्पू कुरकुटे, विलास पडवळ यांनी केली आहे.

कडूस (ता.खेड) परिसराला अवकाळी पावसाने शुक्रवारी (ता.७) सायंकाळी झोडपले. यावेळी आलेल्या वादळामुळे शेतातील हाताशी आलेल्या बाजरी, गहू पिकांना मोठा फटका बसला.

सुमारे अर्धातास टपोऱ्या थेंबांच्या पावसाचा तडाखा बाजरी, गहू, मका, कांदा व आंबा पिकाला मोठ्या प्रमाणात बसला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी फुलोऱ्यात आलेले बाजरीचे व गव्हाचे पीक भुईसपाट झाले. बाजरीचे पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे.

Crop Damage
Crop Damage In Nashik : गारपीटने केला कहर; शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला

पावसाच्या टपोऱ्या थेंबांनी पीक झोडपून निघाले. बाजरीचे दाणे भरलेली कणसे पावसाच्या पाण्यामुळे अधिक भारदस्त झाली, जड झालेली पिकांची ताटे वाऱ्यामुळे जमिनीवर झोपली गेली.

कापणी केलेली बाजरी व शेतातच अरण लावून ठेवलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले. कांद्याच्या अरणीवर आच्छादन टाकण्यासाठी शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. काहीकाळ परिसरातील वीजपुरवठासुद्धा खंडित आला होता.

सुदैवाने घर, गोठा आदी मालमत्तेचे मात्र नुकसान झाले नाही. झाडावरील कैऱ्यांची मोठ्या प्रमाणात गळ झाली. अनेक झाडांच्या खाली कैऱ्यांचा सडा पडलेला दिसत आहे.

वालचंदनगर (जि. पुणे) शनिवारी (ता. ८) रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे हिंगणेवाडी (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या दोन खोल्यामधील पत्रे उडून गेले.

तालुक्याच्या पश्‍चिम भागातील भवानीनगर, सणसर, हिंगणेवाडी, मानकरवाडी परिसरामध्ये शनिवारी (ता.८) संध्याकाळी सातच्‍या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. जोराच्या वाऱ्यामुळे हिंगणवाडीमधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे पत्रे उडून गेले.

वीज पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

चास (ता. खेड) व परिसराला सायंकाळी पडलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. वीज कोसळून एका ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. राम गंगाराम काळे (वय ७०) असे मृत पावलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.

वीज पडल्याने काळे यांचे संपूर्ण शरीर भाजून निघाले होते. त्यांचे पार्थिव शरीर शवविच्छेदनासाठी राजगुरुनगर येथे नेण्यात आले असून, खेड पोलिस पुढील तपास करीत आहेत.

चास व परिसरात अनेक गावांमध्ये मागील वर्षी शासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून वीजरोधक यंत्रणा बसविण्यात आलेली होती, तरीही अशा घटना घडत असतील, तर या यंत्रणेचा काय फायदा, याबाबत चौकशी होणे गरजेचे असल्याचे स्थानिक रहिवाशांनी मागणी केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com