Raju Shetti Agrowon
ताज्या बातम्या

Raju Shetti : आजचे सरकार लुच्चे, लफंगे, चोरांचे

Raju Shetti Statement : बांधावर बसून मी जो दर सांगेल तोच दर कारखान्याने द्यावा, अशी धमक शेतकऱ्यांमध्ये तयार होणे गरजेचे आहे. शेतकरी संघटना तुमची बाजू मांडेल.

Team Agrowon

Sangli News : आजचे सरकार लुच्चे, लफंगे, चोरांचे असून, आपणाला ही व्यवस्था तोडून काढावी लागेल. शोषणमुक्त शेतकरी करण्यासाठी तुम्ही मला साथ द्या. मोदी, शिंदे, अजित पवार व फडणवीस यांना महाराष्ट्राचा विकास करण्याचा खूप ध्यास लागला असून, शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या या सरकारला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा अधिकार नसल्याचा उपरोधिक टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी लगावला.

नेर्ले (ता. वाळवा) येथील विलासराव मल्टिपर्पज हॉलमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियानां’तर्गत आयोजित सभेत ते बोलत होते.

या वेळी ज्येष्ठ नागरिक ए. आर. पाटील अध्यक्षस्थानी होते. मार्गदर्शक रावसाहेब पाटील, स्वाभिमानी संघटनेचे तानाजी साठे, अशोक बल्लाळ, ‘स्वाभिमानी’चे राज्य प्रवक्ते एस. यू. संदे, भागवत जाधव, रमेश पाटील, प्रभाकर पाटील, एकनाथ निकम, हणमंत कुंभार, शिवाजी पाटील, जगन्नाथ भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

राजू शेट्टी म्हणाले, ‘‘किल्ले रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने शेतकरी जनजागृती अभियानाला सुरुवात केली आहे. छत्रपती शिवरायांनी शेतकऱ्यांची लूट होऊ नये, यासाठी कायदे केले होते. तसा आदेश त्यांनी दिला होता. त्या काळामध्ये शेतकऱ्यांना पहिली कर्जमाफी करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते.

परंतु आज शेतकऱ्यांची लूट करून त्यांना देशोधडीला लावण्याचे काम आजचे सरकार करत करीत आहे. ऊस, कापूस, सोयाबीन, भाजीपाला आदी पिकांना योग्य दर दिला जात नाही. शंभर रुपयांची एफआरपी वाढवून मोदी सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत आहे.

परंतु ऊस शेतीसाठी प्रत्यक्ष खर्च सोडला तर शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीच राहत नाही.’’ शेतकऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. असे हातावर हात ठेवून जर थांबलात तर येणारे दिवस वाईट असल्याचा इशारा त्यांनी दिला.

ते पुढे म्हणाले, ‘‘बांधावर बसून मी जो दर सांगेल तोच दर कारखान्याने द्यावा, अशी धमक शेतकऱ्यांमध्ये तयार होणे गरजेचे आहे. शेतकरी संघटना तुमची बाजू मांडेल. मी देखील रस्त्यावर उतरेन. परंतु तुम्ही सगळ्यांनी मला साथ देणे गरजेचे आहे. आपल्याच शेताच्या एखाद्यावर ईर्षा करून शेती सुधारणार नाही.

जोपर्यंत शेतकऱ्यांना पिकवलेला माल विकायला जमणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य न्याय मिळणार नाही. शेतकऱ्यांनी आमदार, खासदार यांच्यावर दबाव निर्माण केला पाहिजे, तरच तुमचे प्रश्‍न मार्गी लागतील. कारखानदार कशा पद्धतीने लुबाडतात. साखर, इथेनॉल, बगॅसच्या माध्यमातून पैसा उभा करतात. परंतु शेतकऱ्यांना त्यातले पैसे मिळत नाहीत.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT