Rajkumar Chaugule
Rajkumar Chaugule Agrowon
ताज्या बातम्या

Agri Journalism Award : ‘अॅग्रोवन’च्या चौगुले यांना आदर्श कृषी पत्रकार पुरस्कार

Team Agrowon

Rajkumar Chaugule सोलापूर ः महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या वतीने रविवारी (ता.१२) बामणी (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथे ऊसविकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त उसाचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या राज्यातील २५ हून अधिक शेतकऱ्यांना ऊसभूषण, ऊसविकास कार्यगौरव पुरस्कार देण्यात येईल. तसेच आदर्श कृषी पत्रकार पुरस्काराचे वितरणही होईल.

यंदाचा आदर्श कृषी पत्रकार पुरस्कार ‘अॅग्रोवन’चे कोल्हापूरचे जिल्हा बातमीदार राजकुमार चौगुले यांना जाहीर झाला आहे. राज्य ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष अतुल माने-पाटील यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. बामणीतील आर. के. मंगल कार्यालयात सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होईल.

Awardमाने-पाटील म्हणाले, ‘‘या ऊस विकास परिषदेमध्ये महाराष्ट्रातील ऊस शेतीचे आजचे चित्र तसेच शेतकऱ्यांची स्थिती, ऊस शेतीमधील समस्या आणि त्यावरील उपायांवर चर्चा होईल.

कृषिभूषण संजीव माने हे ‘एकरी शंभर टन ऊस उत्पादन सहज शक्य’ यावर, ऊस विकास अधिकारी उत्तमराव परीट हे ‘आदर्श ऊस शेती’वर, संतोष सहाने हे ‘सेंद्रिय शेती’ या विषयावर मार्गदर्शन करतील.’’

‘‘राज्यातील ऊस उत्पादनातील उल्लेखनीय काम करणाऱ्या २५ हून अधिक शेतकऱ्यांना यावेळी ऊसभूषण, ऊसविकास कार्यगौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येईल.

यंदाचा आदर्श कृषी पत्रकार पुरस्कार चौगुले यांच्यासह शिवाजी हळणवर (पंढरपूर) यांना देण्यात येईल,’’ असेही माने-पाटील म्हणाले.

या वेळी अतुल मस्के, किरण चव्हाण, उत्तम परीट, राजेंद्र डुचे, कृष्णात पाटील, सचिन पाटील, अमोल खोत उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT