VSI Award : विघ्नहर कारखान्याचा दोन पुरस्काराने गौरव

श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला राज्य व राष्ट्रीय पातळीवरील दोन पुरस्काराने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शनिवारी (ता. २१) गौरविण्यात आले.
Vighnhar Sugar
Vighnhar SugarAgrowon
Published on
Updated on

जुन्नर, जि.पुणे ः येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला (Vighnhar Sugar Factory) राज्य व राष्ट्रीय पातळीवरील दोन पुरस्काराने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (Vasantdada Sugar Institute) वार्षिक सर्वसाधारण सभेत शनिवारी (ता. २१) गौरविण्यात आले.

Vighnhar Sugar
Malegaon Sugar Factory : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘माळेगाव’चा सन्मान

हंगाम २०२१-२२ मधील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा मध्य विभागातील उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धनाचा राज्यस्तरीय पुरस्कार तसेच नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप.

शुगर फॅक्टरीज नवी दिल्लीचा देशातील उच्च साखर उतारा विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी केंद्रीय कृषिमंत्री पद्मविभूषण शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप, कार्यकारी संचालक भास्कर घुले व संचालक मंडळाने पुरस्काराचा स्वीकार केला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,माजी गृहमंत्री व दिलीप वळसे पाटीला तसेच साखर उद्योगातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Vighnhar Sugar
Sugarcane Harvester : ऊसतोडणीसाठी ९०० हार्वेस्टरकरिता मदत करू

अध्यक्ष सत्यशील शेरकर म्हणाले, की कै. वसंतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्व.निवृत्तिशेठ शेरकर यांनी विघ्नहर साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. यापूर्वी कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

यावेळी मिळालेल्या दोन्ही पुरस्कारांमुळे विशेष आनंद होत आहे.या पारितोषिकांमुळे विघ्नहरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Vighnhar Sugar
VSI Awards : ‘व्हीएसआय’चे पुरस्कार जाहीर

शेरकर पुढे म्हणाले, कारखाना गाळप क्षमतेचा पुरेपूर वापर करत आहे.उसाची संगणकीकृत नोंदणीमुळे ऊस तोडणी नियोजन काटेकोरपणे केले जाते. यामुळे साखर उतारा वाढण्यास मदत होत असल्याने उच्च साखर उतारा विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार मिळाला आहे.

तसेच एक डोळा पद्धतीने ऊस रोप लावणीवर भर देणे, हुमणी कीड नियंत्रणासाठी भुंगेरे गोळा करून नियंत्रणावर विशेष भर देणे,उत्कृष्ट बायोकंपोस्ट खत निर्मिती करणे, जैविक खते निर्मिती प्रकल्पामार्फत जैविक खते पुरवठ्यावर भर देणे,उत्कृष्ट प्रतीचा बेणे पुरवठा करणे, खोडवा पीक व्यवस्थापनावर जास्तीतजास्त भर देणे, ठिबक सिंचनासाठी विशेष प्रयत्न करणे, प्रभावीपणे काम करण्याच्या या बाबी विचारात घेऊन वसंतदादा इन्स्टिट्यूटने हा सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धनाचा पुरस्कार कारखान्याला दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com