Orange  Agrowon
ताज्या बातम्या

Orange Crop Damage : पावसाचा संत्रा बागांना फटका

Heavy Rain Damages Oranges: पश्चिम विदर्भात गेल्या काही दिवसात संत्रा बागांच्या पट्ट्यात दोन वेळा अतिवृष्टी झाली. शिवाय सातत्याने ढगाळ वातावरण बनलेले आहे.

Team Agrowon

Akola News : पश्चिम विदर्भात गेल्या काही दिवसात संत्रा बागांच्या पट्ट्यात दोन वेळा अतिवृष्टी झाली. शिवाय सातत्याने ढगाळ वातावरण बनलेले आहे. सतत पाऊस होत आहे. त्यामुळे आंबिया बहराची फळे मोठ्या प्रमाणात गळू लागली आहेत.

आतापर्यंत १५ ते २० टक्के फळे पिवळी होऊन जमिनीवर आल्याचे संत्रा उत्पादक सांगत आहेत. तर हे वातावरण बागांमध्ये कीड-रोगांसाठी पोषक बनू लागल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

अकोला, बुलडाणा या जिल्ह्यात प्रामुख्याने सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अकोट, तेल्हारा, संग्रामपूर, जळगाव जामोद या भागात संत्रा बागांचे मोठे क्षेत्र आहे. प्रामुख्याने संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा, टुनकी, सोगोडा या शिवारात संत्र्याची लागवड क्षेत्र सर्वाधिक आहे.

गेल्या आठवड्यापासून सातत्याने पाऊस तसेच ढगाळ वातावरण बनलेले आहे. २१ जुलै आणि पुन्हा २७ जुलैच्या रात्री तुफान पाऊस झाला. या पावसाने नदी-नाल्यांना पूर आला. पुराचे पाणी काही बागांमधूनही गेले आहे. नवीन लागवड केलेल्या बागांमधील रोपांना याचा मोठा फटका बसला आहे.

उत्पादन देणाऱ्या बागांमध्ये बहुतांश प्रमाणात सध्या आंबिया बहराची फळे आहेत. ही फळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विक्रीला येतात. शिवाय काही शेतकरी मृग बहराचेही नियोजन करीत आहेत. आंबिया बहराची फळे लिंबूच्या आकाराची झाली आहेत. या वातावरणामुळे फळे देठापासून आपोआप तुटत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

यंदाच्या हंगामात मृग बहराची फूट व्यवस्थित झालेली नाही. झाडांवर असलेल्या आंबिया बहराची फळे गळत असल्याने उत्पादकांना आर्थिक झळ पोचण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे हे वातावरण मृग बहर फुटण्यासाठी पोषक ठरू शकते, असेही शेतकरी सांगत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Barshi APMC Election: बार्शी बाजार समिती निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरु

Micro Irrigation Scheme: सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष मोहीम

Cotton Harvest Wage: कापूस वेचणी मजुरी दर पोहोचला ११ रुपये किलोवर

Farmer Issues: जिल्हाधिकाऱ्यांनी जाणल्या रेशीम शेतकऱ्यांच्या अडचणी

Ativrushti Nuksan: अतिवृष्टीने मोठे नुकसान; दिवाळी सुनी..सुनी

SCROLL FOR NEXT