Weather Update  Agrowon
ताज्या बातम्या

Weather News : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज

बंगालच्या उपसागातील वादळी प्रणालीच्या पाठोपाठ अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या प्रणालीमुळे राज्यात ढगाळ वातावरण झाले आहे.

टीम ॲग्रोवन

Pune Weather Update : बंगालच्या उपसागातील वादळी (Mandous Cyclone) प्रणालीच्या पाठोपाठ अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या प्रणालीमुळे राज्यात ढगाळ वातावरण (Cloudy Weather) झाले आहे. तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत. राज्याच्या किमान तापमानात (Temperature) वाढ झाली आहे. आज (ता. १४) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast) हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तरेकडील राज्यांमध्येही गारठा कमी - अधिक होत असून, राजस्थानमधील चूरू येथे मंगळवारी (ता.१३) देशाच्या सपाट भू-भागावरील सर्वांत नीचांकी ४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात मात्र किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात किमान तापमान १०.५ अंश सेल्सिअस होते. उर्वरित राज्यात किमान तापमान १६ ते २६ अंशांच्या दरम्यान होते.

वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली आहे. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. आज (ता. १४) मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. पावसाळी वातावरण निवळताच उद्यापासून (ता.१५) किमान तापमानात ३ ते ५ अंशांची घट होण्याची शक्यता आहे.

कमी दाबाचे क्षेत्र होणार तीव्र

केरळ आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे अरबी समुद्रात केरळ, कर्नाटकच्या किनाऱ्यालगत मंगळवारी (ता.१३) कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. ही प्रणाली आज आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. ती भारताच्या किनाऱ्यापासून दूर जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, दक्षिण अंदमान समुद्रात सुमात्रा बेटाजवळ समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे

मंगळवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे २८.६ (२०.१), जळगाव ३०.६ (२१.५), धुळे ३१.० (१८.५), कोल्हापूर २७.७ (२२.०), महाबळेश्वर २२.०(१६.२), नाशिक २८.८ (१९.९), निफाड ३०.२ (१०.५), सांगली २७.७ (२१.८), सातारा २८.९(२२.०), सोलापूर ३०.२ (२२.२), सांताक्रूझ ३४.२(२५.४), डहाणू ३४.२ (२३.२), रत्नागिरी ३२.० (२५.३), औरंगाबाद २८.२ (१७.७), नांदेड २९.० (२१.६), उस्मानाबाद - (१८.४), परभणी २९.० (२१.१), अकोला ३०.८ (२२.३), अमरावती २९.४ (२०.४), बुलडाणा २९.० (२०.०), ब्रह्मपुरी ३४.२ (२१.६), चंद्रपूर ३०.० (१८.४), गडचिरोली ३०.०(१८.४), गोंदिया ३०.५(२०.०), नागपूर ३०.६ (२१.४), वर्धा ३३.०(२२.४), यवतमाळ - (१८.०).

विजांसह पावसाचा अंदाज :

मध्य महाराष्ट्र : नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर पुणे.

मराठवाडा : औरंगाबाद, जालना.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change: हवामान बदलते, शेतीत बदल कधी?

Kharif Season Preparation: शेतकऱ्यांकडून रोपवाटिकेसाठी रान भाजणीची कामे अंतिम टप्प्यात

Sugar Factory Seizure: एफआरपी थकवणाऱ्या सात साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई

Farm Loan Waiver: प्रलंबित कर्जमाफीला हिरवा कंदील; १४०० कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

Onion Farmer Subcommittee: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उपसमिती; पंधरा दिवसांच अहवाल देण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT