Heavy Rain Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात १८ ऑगस्टपासून पाऊस वाढणार; मराठवाडा, विदर्भात पाऊस सुरु होणार

Maharashtra Rain Update : राज्यात गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून पाऊस नाही. त्यामुळं अनेक भागांमधील पीकं माना टाकत आहेत. यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली. पण आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे.

Team Agrowon

Maharashtra Monsoon Update : राज्याच्या अनेक भागांमध्ये १८ ऑगस्टपासून पाऊस सुरु होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला.

माॅन्सूनचा आस असलेला कमी दबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याशी कायम आहे. ईशान्य भारत आणि बंगालच्या उपसागराच्या पूर्वमध्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ४.५ ते ७.६ किलोमीटर उंचीवर आहे. ही स्थिती दक्षिणेकडे झुकलेली आहे. यामुळे बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडे कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचा अंदाज आहे.

उत्तर प्रदेश आणि शेजारच्या भागातही समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकर वाऱ्याची स्थिती आहे.

राज्यात पावसासाठी आज पोषक हवामान नव्हते. त्यामुळे बहुतांशी भागांमध्ये पावसाची उघडीप होती. तर काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. हवामान विभागाने आज राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज दिला. तर उद्यापासून विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने उद्या विदर्भातील अमरावती,

यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात ठिकठाकणी विजांसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातही कही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने १८ ऑगस्ट आणि १९ ऑगस्ट रोजी विदर्भ आणि मराठवड्यातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाचा येलो अलर्ट दिला.

या दोन्ही दिवशी संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

तर खानदेशातील जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. राज्याच्या इतर भागांतही ठिकठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Petrol Pump Closure: बुलडाणा जिल्ह्यात निम्म्याहून अधिक पेट्रोल पंप बंद

Onion Prices Issues: बागलाण तहसीलमध्ये कांदा दरासाठी ठिय्या

Medical Shop Strike: औषध विक्रेत्यांचा आज संप

Jal Jeevan Mission: नळ पाणी योजनांच्या कामांना गती द्या : आमदार यड्रावकर

Underwater Tourism: सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनात ‘गुलदार’ची भर

SCROLL FOR NEXT