Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : सातारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

ऐन पीक काढणीच्या हंगामात सतत पाऊस होत असल्याने पिकांच्या नुकसानीत भर पडत आहे. या नुकसानीची पुन्हा एकदा पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

टीम ॲग्रोवन

सातारा : जिल्ह्यात बुधवारी अनेक भागात कमी-अधिक स्वरूपात पाऊस झाला (Rainfall) आहे. २४ तासांत सरासरी १३.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ऐन पीक काढणीच्या (Crop Harvest) हंगामात सतत पाऊस होत असल्याने पिकांच्या नुकसानीत (Crop Damage) भर पडत आहे. या नुकसानीची पुन्हा एकदा पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाच्या नुकसान भरपाई प्रतीक्षा असतानाच ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस झोडपून काढत असल्याने पिके कुजून खराब होऊ लागली आहे. सोयाबीन काढणीला आले असून, सध्या ज्वारी, बाजरी भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच परतीचा पाऊस जोरदार पडत असल्याने पिकांचे नुकसान सुरू झाले आहेत.

सोयाबीन उगवू लागले असून ज्वारी, बाजरी आडवी होऊ लागली आहे. खरिपात साडेतीन लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. पहिल्या टप्प्यात पेरणी झालेली पिके काढायला आली असतानाच परतीचा पाऊस शेतकऱ्यांची डोकेदुखी झाला आहे. सततच्या पावसामुळे शेतातील पाणी निघत नसल्यामुळे पिके कुजू लागली आहे.

तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये

सातारा ४.७, जावळी १८.७, पाटण १०.२, कऱ्हाड १८.९, कोरेगाव ७, खटाव ६, माण १९, फलटण १९.५, खंडाळा २८.३, वाई ९.९, महाबळेश्‍वर २२.७.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manikrao Kokate Resigns: अखेर कोकाटेंना मंत्रीपद सोडावं लागलं, त्यांचा राजीनामा अजित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे पाठवला

Sugarcane Price: दीड महिन्यानंतरही १२ साखर कारखान्यांकडून ऊसदर नाहीच

Mahavistar AI App: ‘महाविस्तार एआय’कडे शेतकऱ्यांचा कल

Land Records: मंडलस्तरावर दर मंगळवारी होणार फेरफार अदालत

Sugarcane Payment Delay: शेतकऱ्यांची बिले थकवली, 'काटामारी'चाही गंभीर प्रश्न, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT