Pune Dam Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : अनेक धरणक्षेत्रांत उघडीप

Latest Rain Update : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने धरणक्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. राज्यातील ठरावीक धरणक्षेत्रांत पावसाच्या मध्यम ते जोरदार पाऊस पडत असला तरी अनेक धरणक्षेत्रांत पावसाने उघडीप दिली आहे.

Team Agrowon

Pune News : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने धरणक्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. राज्यातील ठरावीक धरणक्षेत्रांत पावसाच्या मध्यम ते जोरदार पाऊस पडत असला तरी अनेक धरणक्षेत्रांत पावसाने उघडीप दिली आहे.

धरणांतील पाण्याच्या आवकेत घट होत असल्याने धरणातील पाणीपातळीत वाढ दिलेली नाही. येत्या काळात धरणक्षेत्रात पाऊस न झाल्यास मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पावसाचा जवळपास दीड महिना झाला आहे. या काळात अद्यापही जोरदार पाऊस झालेला नाही. मॉन्सून २३ जूनच्या दरम्यान दाखल झाल्यानंतर २६ जूननंतर कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही धरणक्षेत्रांत जोरदार पाऊस झाला.

परंतु बहुतांश वेळा हलक्या सरी पडल्या असल्या तरी ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे. काही वेळेस ऊन पडले असून, अधनमधून तुरळक सरी पडल्या आहेत. जुलैमध्ये पाऊस जोरदार पाऊस पडला नसला, तरी काहीशा हलक्या सरी पडत आहेत.

आतापर्यंत कोकणातील धामणी धरणक्षेत्रात सर्वाधिक १८१७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद जलसंपदा विभागाकडे झाली आहे. गेल्या वर्षी याच धरणक्षेत्रात याच कालावधीत १५०० मिलिमीटर पाऊस पडला होता. तर नाशिक विभागातील भंडारदरा धरणक्षेत्रात १२०५ मिलिमीटर, खडकवासला ११३३, राधानगरी १०२९ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

मराठवाडा, विदर्भातील नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे विभागांतील सर्वच धरणक्षेत्रांत गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे धामणी, येलदरी, पेंच तोतलाडोह, गोसी खुर्द, दारणा, भंडारदरा, वाघूर ही धरणे वगळता सर्वच धरणांत पाण्याची पातळी ५० टक्क्यांपेक्षा कमी असून, काही धरणांत अजूनही उपलब्ध पाणीसाठा झालेला नाही.

शुक्रवारी (ता. १४) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोकणातील वैतरणा धरणक्षेत्रात सर्वाधिक ९६ मिलिमीटर पाऊस पडला. तर धामणी धरणक्षेत्रात ७८ मिलिमीटर, तर भातसा धरणक्षेत्रात अवघा २० मिलिमीटर पाऊस पडला. पश्‍चिम महाराष्ट्रातील राधानगरी धरणक्षेत्रात सर्वाधिक ६१ मिलिमीटर, तर दूधगंगा धरणक्षेत्रात ३४ मिलिमीटर पाऊस पडला.

तर कोयना, डिंभे, पानशेत, वरसगाव, पवना, चासकमान, आंध्रा, नीरा देवघर, धोम बलकवडी धरणक्षेत्रांत तुरळक सरी पडल्या असून, खडकवासला, घोड, भाटघर, वीर, कृष्णा धोम, कण्हेर, उजनी या धरणक्षेत्रांत पावसाने उघडीप दिली आहे.

मराठवाड्यातील माजलगाव धरणक्षेत्रात ४२ मिलिमीटर, येलदरी २७ मिलिमीटर, तर दुधना धरणक्षेत्रात हलक्या सरी पडल्या असून, जायकवाडी, मांजरा, पैनगंगा, तेरणा धरणक्षेत्रात पावसाने ढगाळ वातावरण होते.

विदर्भात धरणक्षेत्रात शिडकावा

विदर्भातील नागपूर विभागातील इटियाडोह, गोसीखुर्द, अरुणावती, धरणक्षेत्रांत हलका, तर तोतलाडोह, बाघ शिरपूर, निम्न वर्धा, ऊर्ध्व वर्धा, बेंबळा, काटेपूर्णा, वना, पेनटाकळी, खडकपूर्णा धरणक्षेत्रात पाऊस नव्हता. नाशिक विभागातील दारणा, गंगापूर, भंडारदरा, गिरणा, हतनूर धरणक्षेत्रांत शिडकावा झाला असून, मुळा, वाघूर धरणक्षेत्रात पावसाने चांगलीच उघडीप दिली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT