Cotton Rate Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Crop Damage : आठवडाभर झालेल्या पावसाने भिजलेला कापूस काळवंडला

गेल्या आठवडाभरापासून तालुक्यात दररोज पाऊस होत असल्याने शेतात फुटलेला कापूस ओला होत आहे. बोंड कुजत असून कापसाची प्रत घसरली आहे.

टीम ॲग्रोवन

नांदूरा, जि. बुलडाणा ः गेल्या आठवडाभरापासून तालुक्यात दररोज पाऊस होत असल्याने शेतात फुटलेला कापूस (Cotton) ओला होत आहे. बोंड कुजत असून कापसाची प्रत घसरली आहे. काळवंडलेल्या कापसाला (Cotton Crop Damage) ऐन दिवाळीच्या तोंडावर मातीमोल किमतीत बोळवण होण्याची चिन्‍हे आहेत.

नांदुरा तालुक्याला कॉटन बेल्ट म्हणूनही ओळखले जाते. येथे सर्वाधिक पेरा कपाशीचा असतो. काही भागात सोयाबीनची लागवड केली जाते. याशिवाय मका, तूर, उडीद, मूग व तेलवर्गीय पिकेही घेतली जातात.

मागील वर्षी पावसाळा चांगल्यापैकी झाला होता. विहिरींना पाणी उन्हाळ्यातही उपलब्ध असल्याने मॉन्सूनपूर्व कपाशीची तालुक्यात मोठ्या प्रमाणात पेरणी झालेली आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मॉन्सूनपूर्व कापसाची बोंडे फुलली असतानाच परतीच्या पावसाचे तालुक्यात आगमन झाले. या पावसाने उमललेला कापूस पूर्ण भिजला आहे.

त्याची प्रतही घसरली असून, मजुरांकडून बेभाव वेचाईचा फटका शेतकऱ्यांना सध्या बसत आहे. तर वेचून आणलेला कापूस वाळू घालण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे. दुसरीकडे सोयबीनही काढणीवर आले असून, दमदार पावसामुळे काढणीवर विपरीत परिणाम जाणवत आहे. एकंदरीत परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

तसेच पिवळे सोने म्‍हणून ओळख असणारे सोयाबीन काढणीला तयार आहे. सध्याच्या पावसामुळे सोयाबीनदेखील काळे होऊन त्यातील दाणे फुटत आहेत.

मजुरीचे दर गगनाला

सध्या कापूस वेचणीची लगबग सुरू असून, प्रति किलो ८ ते १० रुपये शेतकऱ्यांना यासाठी मोजावे लागत आहेत. तसेच भाडे म्हणून ऑटोचा कमीत कमी २०० व प्रति मजुराप्रमाणे १० रुपये एजंटला द्यावे लागत आहेत. सोयाबीन सोंगणीसाठी २०० ते ५०० रुपयांपर्यंत मजूर आणावे लागत आहे.

कापसाचे भाव ८ हजारांवर स्थिर

सोशल मीडियावर वेगवेगळ्या वाढलेल्या भावांचे पीक आले असले, तरी तालुक्यात चिल्लर व्यापारी केवळ आठ हजार रुपये प्रति क्विंटलने कापसाची खरेदी करत आहे. कापसात आर्द्रता असल्याचे कारण समोर करून शेतकऱ्यांना लुटण्याचे प्रकार यातून होत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT