Heavy Rain  Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : घाटमाथ्यावर पावसाचे धुमशान

ताम्हिणी येथे २३० मिलिमीटर, दावडीत २०० मिलिमीटर पाऊस

Team Agrowon

पुणे : कोकण, (konkan) घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असला, तरी विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरला आहे. पुणे, सातारा, रायगड जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर पावसाने (Rain) अक्षरशः धुमशान घातले आहे. बुधवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ताम्हिणी येथे २३० मिलिमीटर, तसेच दावडी येथे २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस, किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा या प्रणाली पूरक ठरल्याने मंगळवारी (ता. १३) घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढल्याचे दिसून आले. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत पुणे, सातारा, रायगड जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी १२० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. कोकणातही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.
उत्तर मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार येथे १५०, तर साताऱ्यातील महाबळेश्‍वर येथे १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नंदूरबार, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. खानदेशात मागील तीन दिवस पाऊस सुरूच आहे. काही भागांत जोरदार, सुसाट वारा, तर काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. जळगाव, नंदुरबार व धुळ्यातील सुमारे १८ महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीने पूर्वहंगामी किंवा बागायती कापूस, उडीद, ज्वारी आदी पिकांचे नुकसान झाले आहे. पूर्व विदर्भातही मुसळधार पावसाने हजेरी लावली उर्वरित राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

रविवार (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण :
राजापूर ९०, माणगाव, तळा, रोहा प्रत्येकी ८०, खेड, गुहागर, महाड, मुरबाड, ठाणे, चिपळूण प्रत्येकी ६०, माथेरान, म्हसळा, दापोली, अंबरनाथ, ठाणे, कर्जत, सुधागड, पनवेल, पोलादपूर प्रत्येकी ५०.

मध्य महाराष्ट्र :
नंदूरबार १५०, महाबळेश्‍वर १००, लोणावळा ९०, तळोदा ८०, गगनबावडा, एरंडोल, सुरगाणा, वेल्हे प्रत्येकी ५०, जावळी मेढा, पारोळा, पौड, वडगाव मावळ, धुळे, शाहूवाडी प्रत्येकी ४०, पन्हाळा, अंमळनेर, तळेगाव, चिंचवड, राजगुरुनगर, इगतपुरी, राधानगरी, जळगाव प्रत्येकी ३०.

मराठवाडा :
औरंगाबाद, सिल्लोड प्रत्येकी २०.

विदर्भ :
भंडारा ७०, मौदा, हिंगणा, गोंदिया प्रत्येकी ४०, नागपूर, सेलू, कळंब, भिवापूर, वर्धा, चिमूर, कळमेश्‍वर, उमरेड, कुही, कामठी, मारेगाव, पवनी, अर्णी, गोंदिया, लाखंदूर, यवतमाळ, देवळी प्रत्येकी ३०.

घाटमाथा :
ताम्हिणी २३०, दावडी २००, डुंगरवाडी, कोयना प्रत्येकी १९०, शिरगाव, अंबोणे, प्रत्येकी १७०, भिरा १३०, कोयना १२०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jackfruit Farming : कोकणात प्रक्रियेतून फणसाला मिळतेय नवी झळाळी

AI In Sugar cane: ऊस लागवडीत ‘एआय’ तंत्र वापरणार

Local Self Government : स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटीकरण

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

SCROLL FOR NEXT