Weather Update : मराठवाड्यात पाऊस ओसरण्याची शक्यता

राज्याच्या बहुतांशी भागांमध्ये पाऊस बरसत आहे. मात्र पावसाचा जोर काहीसा कमी झालाय. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भात पावसाचं प्रमाण जास्त होतं.
Weather Update
Weather Update Agrowon

पुणेः राज्याच्या बहुतांशी भागांमध्ये पाऊस बरसत आहे. मात्र पावसाचा जोर (Rain Intensity) काहीसा कमी झालाय. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भात पावसाचं (Rainfall) प्रमाण जास्त होतं. हवामान विभागानं (Weather Department) उद्या सकाळपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट (Rain Orange Alert) जारी केलाय.

Weather Update
Crop Damage : अठरा हजार अतिवृष्टिग्रस्तांना मिळणार ११ कोटींची मदत

कोकणात पावसाचा जोर काहीसा कमी झालाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पाऊस कमी झाला. मात्र वाऱ्याचा वेग मात्र वाढलाय. कोकणात ठिकठिकाणी मंगळवारी सकाळपासून पावसाच्या सरी सुरू होत्या; मात्र दुपारी बारानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला. तर नद्यांच्या पाणीपातळीतदेखील काही प्रमाणात घट झाली. रत्नागिरी, रायगड आणि पालघर जिल्ह्यातही पावसाचा जोर ओसरला. मात्र ढगाळ हवामान कायम आहे.

मध्य महाराष्ट्रात मात्र अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसानं हजेरी लावली. पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाची रिपरिप सुरु होती. तर मंचर येथे ५४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागातही मंगळवारी पावसाचा जोर काहीसा कमी होता. कोल्हापुरात राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पातळी मंगळवारी दुपारी एक वाजेपर्यंत ३० फूट होती. मंगळवार दुपारपर्यंत राधानगरी धरणाचे तीन दरवाजे सुरू असल्याने भोगावती, पंचगंगा नदी पाणी पातळीत वाढ सुरूच राहिले.

Weather Update
Rain Update : खानदेशात सर्वत्र पाऊस

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात जोरदार पावसानं हेजरी लावली. तर सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील ३९ हजार ८२८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सातारा जिल्ह्यातही काही ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली. खानदेशात तीन दिवस सलग धूमाकूळ सुरू आहे. अतिपावसाने कापूस पीक खराब होतच आहे. अनेक भागात सोमवारीदेखील सुसाट वाऱ्याने किंवा मध्यम वादळाने पिकहानी झाली.

मराठवाड्यातही अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस झाला. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांत पावसाचा जोर कमीच राहिला. औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत सोमवारी (ता.१२) सकाळपर्यंत २४ तासांत पावसाचा जोर थोडा अधिक होता. परंतु, मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत मात्र पावसाचा जोर तुलनेने ओसरला. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व ६५ मंडळांत हलक्या पावसाची हजेरी लागली. तर जालना जिल्ह्यातील ४७ मंडलांत तुरळक, हलका तर काही मंडळांत मध्यम पाऊस झाला.

बीड जिल्ह्यातील ५९ मंडळांत पाऊस झाला. केज मंडलात ६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लातूर जिल्ह्यातील ४६ मंडळांत तुरळक पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातही ३७ मंडळांमध्ये हलका पाऊस पडला. अंभी मंडळात ७५.८ मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली. विदर्भातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. वाशीम जिल्ह्यातील संततधार पावसामुळे इंझोरी परिसरामधील नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेकडो हेक्टर जमीन खरडून गेली. तर, सोयाबीन, कापशीसह उभी पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. झंझोरी मंडळात तब्बल १३५ मिलिमीटर पाऊस बरसला.

बुलडाणा जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यानं सुमारे १५ हजार ७०१ हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अमरावती आणि अकोला जिल्ह्यातही काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. तर पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर बहुतांशी ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या सरी झाल्या. हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत पुणे, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसाच ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तर नाशिक, औरंगाबाद, जालना संपूर्ण खानदेश आणि संपूर्ण विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com