Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस शक्य

राज्यात परतीच्या पावसाचा दणका सुरूच आहे. आज (ता. १६) कोकणासह, दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

टीम ॲग्रोवन

राज्यात परतीच्या पावसाचा (Monsoon Heavy Rain) दणका सुरूच आहे. आज (ता. १६) कोकणासह, दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा (Heavy Rain With Lightning) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या सरींची शक्यता आहे.

मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागात कमी अधिक प्रमाणात परतीचा पाऊस सुरूच आहे. शनिवारी (ता.१५) राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली.

बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्रालगत शुक्रवारी (ता. १८) नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रविवार (ता. २०) पर्यंत या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर.

मराठवाडा : बीड, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manoj Jarange Patil: जरांगे पाटलांचे उपोषण यशस्वी,सरकार नमले; हैद्राबाद गॅझेटची ताबडतोब अंमलबजावणी आणि इतर मागण्याही मान्य

Gokul Milk Rate : ‘‘गोकुळ’तर्फे म्हैस, गाय दूध खरेदी दरात एक रुपया वाढ’

Soybean Pest Control: सोयाबीनवरील शेंगा पोखरणारी अळी करा गायब; नियंत्रणासाठी सोप्या पद्धती

August Rainfall : सांगलीत ऑगस्टमध्ये ९३ टक्क्यांनी कमी पाऊस

Sugarcane Crushing : विनापरवाना गाळप केल्यास साखर कारखान्यांवर कारवाई

SCROLL FOR NEXT