Rain Update  Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : वैभववाडीत ढगफुटीसदृश पाऊस

वैभववाडी शहरात मंगळवारी (ता. ६) दुपारी विजांच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश पाऊस झाला. जिल्ह्यात बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. वैभववाडी शहरात ४५ मिनिटांत ९२ मिमी पावसाची नोंद झाली.

टीम ॲग्रोवन

सिंधुदुर्गनगरी ः वैभववाडी शहरात मंगळवारी (ता. ६) दुपारी विजांच्या कडकडाटासह (Rain With Lightning) ढगफुटीसदृश पाऊस (Rain Like Cloudburst) झाला. जिल्ह्यात बहुतांश भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला. वैभववाडी शहरात ४५ मिनिटांत ९२ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. जिल्ह्याच्या अन्य काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढत असून, समुद्रातदेखील वादळी स्थिती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. मंगळवारी (ता. ६) सकाळपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारी साडेतीनपासून वैभववाडी शहरात ढगफुटीसदृश पावसाला सुरुवात झाली. संभाजी चौकात तर रस्त्यावर फूटभर पाणी साचले होते. जिल्ह्याच्या इतर भागातदेखील दमदार पाऊस झाला. सह्याद्री पट्ट्यातील गावांतही मुसळधार पाऊस झाला.

४५ मिनिटांत ९२ मिमी पावसाची नोंद

जिल्ह्यात आठ तालुक्यांत झालेला पाऊस मिमीमध्ये

देवगड ९४

मालवण १०२

सावंतवाडी ७७.५

वेंगुर्ला ८८.८

कणकवली ८६.८

कुडाळ ९३.४

वैभववाडी ९२.५

दोडामार्ग ८७.८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Anudan: नांदेडमध्ये कृषी यांत्रिकीकरणातून १२.७० कोटींचे अनुदान वितरित

Raju Shetti: बोगस आणि निकृष्ट खते, कीडनाशकांमुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींकडून कारवाईची मागणी

Maharashtra Khat Satha: खरिपासाठी १.५० लाख टन युरिया, २५ हजार टन डीएपीचा संरक्षित साठा

Pani Tanchai Upay: पाणी टंचाईवर मात करत पेणच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Bhat Sheti in Maharashtra: सूर्या प्रकल्पामुळे उन्हाळी भातशेती बहरली

SCROLL FOR NEXT