sindhudurg rain  Agrowon
ताज्या बातम्या

Sindhudurg Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कमी

Latest Rain News : गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर शुक्रवारी (ता. २१) कमी झाला आहे. जिल्ह्यात सर्वत्र हलक्या सरी पडत आहेत.

Team Agrowon

Sindhudurg News : गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर शुक्रवारी (ता. २१) कमी झाला आहे. जिल्ह्यात सर्वत्र हलक्या सरी पडत आहेत. जनजीवन पुर्वपदावर येत असले तरी अद्याप नद्यांची पाणीपातळी वाढलेलीच आहे.

अनेक बाजारपेठांमध्ये साचलेले पाणी हळूहळू ओसरू लागले आहे. दरम्यान गुरुवारी (ता. २०) झालेल्या अतिवृष्टीने मोठी पडझड झाली असून लाखो रुपयांची हानी झाली.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला गुरुवारी सकाळपासूनच पावसाने झोडपून काढले. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली. सायकांळी उशिरा जिल्ह्यात बहुतांश भागांत गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. अतिवृष्टीमुळे मालवण, कुडाळ, बांदा येथील बाजारपेठांमध्ये पुराचे पाणी शिरले. झाराप येथे रेल्वे रूळावर पाणी साचल्यामुळे काही काळ रेल्वे वाहतूक थांबविण्यात आली.

कोकण रेल्वेमार्गावरील बहुतांश रेल्वेगाड्या दोन ते तीन तास उशिराने धावत होत्या. मालवणातील रस्त्यालगतची घरे, दुकानांत पावसाचे पाणी शिरल्याने तेथील नागरिकांची तारांबळ उडाली. वेंगुर्ल्यातील होडावडा पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

रावदस पुलावर पाण्यामुळे पाट-परूळे मार्गावरील, कणकवलीतील आचरा-कणकवली मार्गावर साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक ठप्प झाली. भुईबावडा घाटात (ता. वैभववाडी) दरड कोसळल्यामुळे खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. बांदा परिसरातदेखील पावसाचा धुडगूस सुरू आहे.

या भागातील बहुतांश रस्ते पाण्याखाली आहेत. तेरेखोल आणि गडनदीने इशारा पातळी ओलांडली होती. जिल्हयात पावसामुळे मोठी पडझड झाली आहे. गुरवारी सायकांळपर्यंत ३५ हून अधिक घरे, गोठ्यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान शुक्रवारी सकाळपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र नद्यांच्या पाणपातळीत अद्याप अपेक्षित घट झालेली नसून सर्वत्र हलक्या सरी सुरू आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Global Economy: जागतिक विकासदर घटण्याचा अंदाज

Delhi Protest Restrictions: पोलिस दिल्लीचे आणि मुंबईचे...

Navratri Festival: शक्ती रुपेन संस्थितः

Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’विरोधात १३ जिल्ह्यांत एल्गार; कोल्हापुरातील बैठकीत निर्धार

State Cooperative Bank Anniversary: राज्य सहकारी बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त बालनाट्याचा उपक्रम

SCROLL FOR NEXT