Rain Update
Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : पाच जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर या पाच जिल्ह्यात गुरुवारी(ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासात पावसाचा जोर (Rain Intensity) कमीच राहिला. काही मंडळात हलका मध्यम झालेला पाऊस (Rainfall) बहुतांश मंडळात तुरळकच झाला. बीड जिल्ह्यातील एका मंडळात अतिवृष्टी (Heavy Rain) झाली.

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ मंडळांपैकी गंगापूर, पैठण, औरंगाबाद या तीन तालुक्यातील २३ मंडळात तुरळक, हलका, मध्यम पाऊस झाला. इतर तालुक्यातील मंडळांकडे पावसाने पाठ फिरवली. जालना जिल्ह्यातील ४९ मंडळांपैकी मंठा, घनसावंगी, परतूर, अंबड, जालना या पाच तालुक्यातील २८ मंडळात तुरळक, हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला.

भोकरदन, जाफराबाद व बदनापूर तालुक्याकडे पावसाने पाठच फिरविली. बीड जिल्ह्यातील पाटोदा, आष्टी, गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई, केज, परळी, धारूर, वडवणी, शिरूर कासार या तालुक्यातील अपवाद वगळता अनेक मंडळामध्ये तुरळक, हलका, मध्यम पाऊस झाला.

माजलगाव तालुक्यातील गंगामसला मंडळात ८४.८ मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली. माजलगाव तालुक्यात पावसाचा जोर थोडा अधिक होता. लातूर जिल्ह्यातील ६० मंडळांपैकी ४३ मंडळात तुरळक, हलका, मध्यम पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ मंडळापैकी ३४ मंडळात तुरळक, हलक्या, मध्यम पावसाची हजेरी लागली.

महिनाभरात ५८ मंडळात अतिवृष्टी

२९ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर दरम्यान जवळपास ५८ मंडळात अतिवृष्टी झाली. त्यामुळे मराठवाड्यातील एकूण अतिवृष्टी झालेल्या मंडळांची संख्या २६६ वर पोहोचली आहे. २९ ऑगस्टला अतिवृष्टी झालेल्या मंडळांची संख्या २०८ इतकी होती. महिनाभरात अतिवृष्टीची ५८ मंडळी वाढली. त्यामध्ये सर्वाधिक १७ मंडळ बीड जिल्ह्यातील असून त्यापाठोपाठ औरंगाबादमधील १६, जालना व उस्मानाबादमधील प्रत्येकी ८, लातूरमधील ६, परभणीतील २ व नांदेड मधील एका मंडळाचा समावेश आहे.

आधीच सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेती पिकाचे नुकसान झालेले असताना अतिवृष्टीच्या मंडळात पडलेली भर नुकसानीच्या क्षेत्रात वाढ करून गेली आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी व पंचनामे करण्याची तसेच नुकसान भरपाई देण्याची मागणी पुढे येते आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shetkari Sangh Fraud : शेतकरी संघ अपहार प्रकरण; मुख्य व्यवस्थापकाला २० लाख दिल्याचा आरोप, संचालक बैठकीत खळबळ

Mhaisal Water Scheme : विस्तारित म्हैसाळ योजनेची कामे तातडीने मार्गी लावा

Maharashtra Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांत विजांच्या लखलखाटांसह पाऊस

Agrowon Podcast : हळदीतील तेजी कायम; कापूस, सोयाबीन, हळद आणि टोमॅटोचे काय आहेत दर ?

Cotton Seed Sales : खानदेशात कापूस बियाणे विक्री १५ मे पासून

SCROLL FOR NEXT