Rain update
Rain update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : परभणी, हिंगोलीतील ८२ मंडलांत पाऊस

टीम ॲग्रोवन

परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२ मंडलांत गुरुवारी (ता. ६) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस झाला. (Rainfall) हिंगोली जिल्ह्यातील सिरसम(६५.५ मिमी), माळहिवरा (६६.६), वाकोडी (६७), नांदापूर (१०५.५), डोंगरकडा (८०) या पाच मंडलांत अतिवृष्टी (Heavy Rain) झाली.

मुसळधार पावसामुळे शेतात कापणी केलेले सोयाबीनचे पीक तसेच बोंडातून फुटलेला कापूस भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परभणी जिल्ह्यातील ५२ मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी, जिंतूर, सेलू तालुक्यांतील अनेक मंडलांत पावसाचा जोर होता.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १०.८ मिमी, ऑक्टोबर महिन्यात १५.४ मिमी, तर १ जूनपासून एकूण सरासरी ६६५.८ मिमी पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ,

सेनगाव तालुक्यातील अनेक मडंलांत पावसाचा जोर होता. हिंगोली, कळमनुरी तालुक्यांतील पाच मंडलांत अतिवृष्टी झाली. अनेक गावांत ढगफुटीसदृश पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ४१.९ मिमी, ऑक्टोबरमध्ये आजवर सरासरी ४२.६ मिमी, १ जूनपासून एकूण सरासरी ९२८.२ मिमी पाऊस झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Turmeric Production : हळद उत्पादन वाढीची सूत्रे

Mango Growing : आंबे पिकविण्याची स्वस्त, सुरक्षित पद्धत

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

SCROLL FOR NEXT