Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ७७ मंडलांत पाऊस

परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ७७ मंडलांत बुधवारी (ता. १२) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील माळहिवरा, टेंभुर्णी या दोन मंडलांत अतिवृष्टी झाली.

टीम ॲग्रोवन

परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ७७ मंडलांत बुधवारी (ता. १२) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत मध्यम ते जोरदार पाऊस (Heavy Rainfall) झाला. हिंगोली जिल्ह्यातील माळहिवरा, टेंभुर्णी या दोन मंडलांत अतिवृष्टी झाली. अनेक मंडलांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यामुळे कपाशीचे पीक आडवे (Crop Damage) झाले.

कापणी केलेल्या तसेच शेतातील उभ्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. परतीचा पावसाचा सर्वाधिक फटका काढणी सुरू असलेल्या सोयाबीन पिकाला बसला आहे. तोंडचा घास हिरावून घेतला जाण्याच्या भीतीमुळे शेतकरी चिंतित झाले आहेत.

परभणी जिल्ह्यातील ४७ मंडलांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. जिंतूर, सेलू, पाथरी, सोनपेठ, पूर्णा, परभणी तालुक्यांतील अनेक मंडलांत जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १२.१ मिमी, ऑक्टोबर महिन्यात सरासरी ४६.४ मिमी, तर १ जूनपासून आजवर एकूण सरासरी ६८६.८ मिमी पाऊस झाला.

हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडलांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यांतील अनेक मंडलांत पावसाचा जोर होता. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी २१.५ मिमी, ऑक्टोबर महिन्यात सरासरी ९८.२ मिमी तर १ जूनपासून आजवर एकूण सरासरी ९८३.८ मिमी पाऊस झाला.

मंडलनिहाय पाऊस (मिमीमध्ये)

परभणी जिल्हा ः परभणी ग्रामीण १४.३, पिंगळी १३.८, झरी ८.३, जिंतूर २९.८, बामणी २०, बोरी ९.५, आडगाव २५.३, चारठाणा ५३, वाघी धानोरा २४.३, दूधगाव ८.३, सेलू ३४.८, देऊळगाव ३०.३, वालूर २५.३, कुपटा १४, चिकलठाणा ११.३, मोरेगाव २१.३, मानवत १४.५, केकरजवळा ६.८, कोल्हा ५, रामपुरी ९, पाथरी १२.३, बाभळगाव ८.८, हादगाव ३६, कासापुरी १७.८, सोनपेठ १५.८, वडगाव ८.३, गंगाखेड १०.३, राणीसावरगाव ६, पिंपळदरी ७.५, चाटोरी ७.५, पेठशिवणी १६.८, रावराजूर ९, पूर्णा १०.८, लिमला ७, कात्नेश्वर २६.३, कावलगाव २२.८.

हिंगोली जिल्हा ःहिंगोली १२.८, नरसी नामदेव १७, सिरसम ५.५, बासंबा १५.५, डिग्रस कऱ्हाळे ३६.५, माळहिवरा ६५.८, खंबाळा ३३, कळमनुरी १८.३, वाकोडी १९.८, नांदापूर १७.५, आखाडा बाळापूर ९.५, वारंगा ६.८, वसमत ८.३, आंबा ४६.५, गिरगाव २१.३, हट्टा २६.३, टेंभुर्णी ६९.३, कुरुंदा २१.३, औंढा नागनाथ २३.३, साळणा २५.३, सेनगाव २२, गोरेगाव ४४.३, साखरा ९, हत्ता १४.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT