Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : हिंगोली,परभणी जिल्ह्यातील ५९ मंडलात पाऊस

हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस कऱ्हाळे मंडलात (७० मिमी) अतिवृष्टी झाली. अनेक भागात ढगांच्या गडगडाट पाऊस झाला. उघडीप नसल्यामुळे सोयाबीन काढणीस उशीर होत आहे.

टीम ॲग्रोवन

हिंगोली ः हिंगोली, परभणी जिल्ह्यातील ५९ मंडलात सोमवारी (ता. १०) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस (Heavy rainfall) झाला. हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस कऱ्हाळे मंडलात (७० मिमी) अतिवृष्टी झाली. अनेक भागात ढगांच्या गडगडाट पाऊस झाला. उघडीप नसल्यामुळे सोयाबीन काढणीस (Soybean Harvesting) उशीर होत आहे.

भिजल्यामुळे सोयाबीन तसेच कापसाचे नुकसान झाले आहे.हिंगोली जिल्ह्यातील २५ मंडलात हलका ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ तालुक्यात पावसाचा जोर होता. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १३.४ मिमी, ऑक्टोंबर महिन्यात सरासरी ७५.६ मिमी तर १ जून पासून आजवर एकूण सरासरी ९६१.२ मिमी पाऊस झाला.

परभणी जिल्ह्यातील ३४ मंडलात हलका ते मध्यम पाऊस झाला. जिंतूर, मानवत, सोनपेठ तालुक्यातील मंडलात पाऊस झाला. अन्य मंडलात तुरळक पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी २.४ मिमी, ऑक्टोंबर महिन्यात ३४ मिमी तर १ जून पासून आजवर सरासरी ६८४.४ मिमी पाऊस झाला आहे.

मंडलनिहाय पाऊस (मिमीमध्ये)

हिंगोली जिल्हा ः हिंगोली २०.८, सिरसम २८.३, बासंबा ५.५, डिग्रस कऱ्हाळे ७०, माळहिवरा ३६.३, खंबाळा ९, नांदापूर १४.८, वारंगा ९.५, आंबा ३६, गिरगाव २१.५, टेंभुर्णी ५.५, कुरुंदा २१.५, औंढानागनाथ १९.८, येळेगाव ३३.५, जवळा बाजार १४.३, साखरा १७.३, पानकन्हेरगाव ६.५. परभणी जिल्हा ः पिंगळी ११.३, सावंगी म्हाळसा १२.३, बामणी १२.३, वालूर ७.५, सोनपेठ १०.३, शेळगाव ११.५, राणीसावरगाव ६.५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT