Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता कायम

मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजा मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने तडाखा दिला आहे. आज (ता. १९) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागातील जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा कायम आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजा मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने (Heavy Rainfall In Maharashtra) तडाखा दिला आहे. आज (ता. १९) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागातील जिल्ह्यात विजांसह पावसाचा (Rain Forecast With Lightning) इशारा कायम आहे. तर उर्वरित राज्यातही हलक्या सरींची (Rain Forecast) शक्यता आहे.

पूर्व-मध्य अरबी समुद्रामध्ये महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून केरळ किनाऱ्यापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. नैर्ऋत्य अरबी समुद्रात ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.

मंगळवारी (ता.१८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. तर कोकण, मराठवाडा, विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडला आहे. आज (ता. १९) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा दक्षिण भागात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत

बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्रालगत ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची निर्मिती झाली आहे. उद्यापर्यंत (ता २०) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली वायव्येकडे सरकताना शनिवार पर्यंत (ता. २२) आणखी तीव्र होणार असून, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

मॉन्सूनच्या माघारीस पोषक हवामान

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) परतीच्या प्रवासात शनिवारी (ता. १५) संपूर्ण बिहार, सिक्कीम, मेघालय, मध्य प्रदेशसह आसाम त्रिपुरा पश्चिम बंगालचा काही भाग, छत्तीसगड विदर्भासह महाराष्ट्राचा आणखी काही भागातून माघार घेतली आहे. उद्यापर्यंतच्या (ता. २०) चोवीस तासांत विदर्भ, छत्तीसगड, अंतर्गत महाराष्ट्र, झारखंड ओडिशाच्या काही भागातून मॉन्सून माघार घेण्यास पोषक स्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT