Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : आज कुठे पडणार पाऊस?

पावसानं आज विदर्भातील अनेक भागांना झोडपलं. वाशिम जिल्ह्यातील मानोरा आणि मंगरुळपीर मंडळांमध्ये प्रत्येकी ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Team Agrowon

पुणेः राज्यात ठिकठिकाणी आज पाऊस (Rainfall) हजेरी लावतोय. मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर (Rain Intensity) तुलनेत अधिक आहे. तर हवामान विभागानं (Weather Department) उद्या सकाळपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट (Heavy Rain Yellow Alert) जारी केलाय. तिकडं माॅन्सूनचा परतीचा प्रवास (Monsoon Return Journey) दोन दिवसांपासून थांबलेला आहे.

पावसानं आज विदर्भातील अनेक भागांना झोडपलं. वाशिम जिल्ह्यातील मानोरा आणि मंगरुळपीर मंडळांमध्ये प्रत्येकी ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर वाशिम शहर, कारंजा लाड, मालेगाव आणि रिसोड मंडळातही पाऊस झाला.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, अर्णी, दरवा, डिग्रस, घाटंजी आणि उमरखेड मंडळात हलका ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. तर गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, तिवसा, सिरोंचा, धामनगाव आणि मोर्सी मंडळात पावसानं हजेरी लावली. तसचं वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यातही ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली.

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. मध्य महाराष्ट्रातही पाऊस कमी होता. कोल्हापूर, नाशिक, पुणे आणि सातारा तसचं जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या.

मराठवाड्यातही अनेक मंडळांमध्ये पावसानं हजेरी लावली. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, वसमत, कळमनुरी, हिंगोली आणि सेनगाव मंडळात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, धर्माबाद, किनवट, कंधार, हाडगाव, नायगाव, मुखेड या मंडळांमध्ये पावसानं हजेरी लावली.

तसचं उस्मानाबाद, परभणी, जालना आणि बीड जिल्ह्यात काही मंडळांमध्ये पावसाचा शिडकावा झाला. हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत राज्यात ठिकठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा जारी केलाय. त्याप्रमाण अनेक ठिकाणी आज दुपारनंतर पाऊस सुरु होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT