Himachal Flood Update : अंबाला, हरियाना : संपूर्ण उत्तर भारतीय (North India) पट्ट्यात आणि विशेषत: हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाना सारख्या राज्यांमध्ये मुसळधार पावसाने सामान्य जीवनावर परिणाम झाला असून अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्याने सेवा निलंबित करण्यात आली आणि सनहवाल-अंबाला मार्गावरील गाड्या वळवण्यात आल्या, अशी माहिती उत्तर रेल्वेने दिली.
दरम्यान, हिमाचल प्रदेशात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने भूस्खलनाच्या घटना घडल्या त्यामुळे रस्त्यांचे आमि पुलांचे नुकसान झाले.
अविरत आणि मुसळधार पावसामुळे नद्यांना आलेल्या पुरात गेल्या ४८ तासांत राज्यात २० जणांचा बळी गेला.
कुल्लू हिमाचल प्रदेशातील सर्वात जास्त प्रभावित जिल्ह्यांपैकी एक असून बियासच्या वाढत्या भरतीमुळे ट्रक वाहून गेला. मंडीमध्ये, पंचवक्त्र मंदिर बियासच्या पाण्याखाली गेले.
यमुना धोक्याच्या पातळीवर
नवी दिल्ली : यमुना नदीतील पाण्याची पातळी २०६.२४ मीटरवर पोहोचली आहे, जी २०५.३३ मीटरच्या धोक्याच्या पातळीपेक्षा किंचित जास्त आहे, असे केंद्रीय जल आयोगाने मंगळवारी (ता. ११) सांगितले.
दिल्लीतील जुन्या यमुना पुलावरील रेल्वे वाहतूक मंगळवारी सकाळी ६ वाजल्यापासून तात्पुरती स्थगित करण्यात आली असल्याचे उत्तर रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले. सततच्या पावसामुळे उत्तराखंडमधील डेहराडूनमधील विकासनगर येथेही यमुनेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. राजधानीसह वायव्य भारतातील पावसाच्या दरम्यान हरियानाने हथनीकुंड बॅरेजमधून नदीत अधिक पाणी सोडल्याने यमुनेची पाण्याची पातळी सतत वाढत आहे.
गंगोत्री महामार्गावर दरड कोसळून ४ ठार
उत्तरकाशी : उत्तराखंडमधील गंगनानी जवळ गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला आणि १० जण जखमी झाले, असे पोलिसांनी मंगळवारी (ता. ११) सांगितले. जखमी प्रवाशांना उपचारासाठी सीएससी भटवाडी येथे दाखल करण्यात आले असून बचावकार्य सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आसाममध्ये पुरामुळे ५४५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान
लखीमपूर, आसाम : आसाममधील लखीमपूर जिल्ह्यातील पूरस्थिती बिघडली असून अनेक नवीन क्षेत्र पुराच्या पाण्यात बुडाले आहेत, ज्यामुळे सुमारे ६० हजार ३०० लोक प्रभावित झाले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.