Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : पाच जिल्ह्यांत पावसाचे धुमशान सुरूच

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाचही जिल्ह्यांत कमीअधिक प्रमाणात परतीच्या पावसाचे धुमशान कमी-अधिक प्रमाणात सुरूच आहे.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाचही जिल्ह्यांत कमीअधिक प्रमाणात परतीच्या पावसाचे (Heavy Rainfall) धुमशान कमी-अधिक प्रमाणात सुरूच आहे. गुरुवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत लातूर (Latur Rainfall) जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहिला.

तर गुरुवारी सकाळपासून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. या पावसामुळे नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होण्याची चिन्ह आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ४० मंडलांत गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत तुरळक, हलका, मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यातील वाळूज मंडलात नोंदल्या गेलेला ६४ मिलिमीटर पाऊस सर्वाधिक राहिला.

बहुतांश मंडलातील पावसाची हजेरी तुरळक हलकीच होती. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी २९ मंडलांत तुरळक हलका पाऊस झाला जिल्ह्यातील परतूर मंडलात झालेला ३४.८ मिलिमीटर पाऊस सर्वाधिक राहिला. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ३१ मंडलांत तुरळक, हलका पाऊस झाला. धारूर तालुक्यातील धारूर मंडलात झालेला २९.८ मिलिमीटर पाऊस सर्वाधिक राहिला.

लातूर जिल्ह्यातील सर्व साठ मंडलांत पावसाची तुरळक, हलकी, मध्यम ते दमदार हजेरी लागली. जिल्ह्यातील बाभळगाव मंडलात सर्वाधिक ६५.८ मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीचा नोंद झाली. लातूर मंडलात २३.८, हरंगुळ २३.८, पानचिंचोली २५.३, कासारबालकुंदा ४४.८, वलांडी ४५, साकोळ ४५, हिसामाबाद २८.३ मिलिमीटर झालेला पाऊस दखलपात्र राहिला. उस्मानाबाद जिल्ह्यातील २५ मंडलांत तुरळक, हलका पाऊस झाला.

आष्टी परिसराला अतिवृष्टीचा तडाखा

आष्टी, जि. बीड : आष्टी शहर व परिसरात गुरुवारी सकाळी झालेल्या अतिवृष्टीने शहर परिसराला मोठा तडाखा बसला. विशेष करून तालुक्यातील पांढरी परिसरात या पावसाचा जोर अधिक होता. यामुळे करंजीच्या ओव्हर फ्लो झालेल्या तळ्याच्या सांडव्यातून पाणी वाहू लागले. शहरातील तळ्याला आलेल्या पाण्यामुळे पाण्यात गेले आहे. शेतीचेही या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.

नुकसानीची प्राथमिक माहिती मागवली...

जून ते ऑगस्टदरम्यान झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीनंतर पुन्हा एकदा अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाचे नुकसान होते आहे. या अतिवृष्टी, सततचा पाऊस व पुरामुळे होणाऱ्या नुकसानीची विभागीय स्तरावरून प्रत्येक जिल्ह्याला प्राथमिक माहिती मागविण्यात आल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT