Rabi Sowing
Rabi Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Sowing : सात लाख ९ हजार ५९२ हेक्टरवर रब्बी पीक

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत रब्बीचे (Rabi Acreage) सरासरी क्षेत्र ७ लाख ४१ हजार १८० हेक्टर आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात ७ लाख ९ हजार ५९२ हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या ९५.७४ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी (Rabi Sowing) झाली आहे. तीनही जिल्ह्यातील सरासरी तापमान २५ अंश सेल्सिअस व आर्द्रता ५० टक्के असून थंडीचे प्रमाण कमी जास्त होत आहे.

यंदा रब्बी हंगामात तिन्ही जिल्ह्यांत ज्वारी व गहू पिकाची सरासरी क्षेत्राच्या तुलनेत अपेक्षित पेरणी झालीच नाही. तर मका व हरभरा पिकाची मात्र सरासरी क्षेत्राच्या पुढे जाऊन पेरणी झाली आहे. यंदा तीनही जिल्ह्यांत रब्बी ज्वारीचे सरासरी क्षेत्र ३ लाख २ हजार १३८ हेक्टर आहे. त्या तुलनेत २ लाख ६ हजार २६१ म्हणजे सरासरी क्षेत्राच्या ६८ टक्केच पेरणी झाली आहे. ज्वारीचे पीक काही ठिकाणी वाढीच्या तर काही ठिकाणी पोटरीच्या अवस्थेत आहे.

गव्हाचे सरासरी क्षेत्र १ लाख ५७ हजार ११६ हेक्टर असताना प्रत्यक्षात १ लाख ४९ हजार ६३८ हेक्टरवर म्हणजे सरासरी क्षेत्राच्या ९५ टक्के पेरणी झाली आहे. गव्हाचे पीक उगवण ते वाढीच्या अवस्थेत आहे. मका पिकाचे सरासरी क्षेत्र ३८२४७ हेक्टर असताना प्रत्यक्षात ४४ हजार ८१ हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या ११५ टक्के क्षेत्रावर मकाची पेरणी झाली आहे.

पेरणी झालेले मका पीक उगवण ते वाढीच्या अवस्थेत आहे. हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र २ लाख ३६ हजार ८४१ हेक्टर असताना प्रत्यक्षात २ लाख ९७ हजार ८०८ हेक्टर अर्थात सरासरीच्या १२५ टक्के क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. उगवण ते वाढीच्या अवस्थेतील हरभरा पिकावर अल्प प्रमाणात मरचा प्रादुर्भाव वगळता इतर प्रादुर्भाव आढळून आला नसल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

कडधान्य, तृणधान्य पेरणीलाही प्राधान्य

तीनही जिल्हे मिळून करडईची ४५९ हेक्‍टरवर, जवसची ३३ हेक्टरवर, सूर्यफुलाची ११४ हेक्टरवर तर इतर गळीत धान्यांची ३१३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. याशिवाय ८६१७ हेक्टरवर इतर कडधान्यांच्या तसेच १२४६ हेक्टरवर इतर तृणधान्यांच्या पेरणीलाही शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

Agrowon Podcast : कापूस भाव स्थिरावले ; कापूस, सोयाबीन, तूर, तसेच आल्याचा काय आहे दर ?

Animal Treatment : दररोज ३०-४० जनावरांवर उपचार बंधनकारक

Kharif Season : खरिपात वाढणार सोयाबीन, कपाशी क्षेत्र

SCROLL FOR NEXT