Pune News: महात्मा फुले (राहुरी) कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या मुलाखतीसाठी गैरप्रकारांची चौकशी चालू असलेल्या शास्त्रज्ञांनाही निमंत्रित केल्याने खळबळ उडाली आहे. या बाबत शास्त्रज्ञांनी थेट राज्यपालांच्या कक्षेतील कुलगुरू शोध समितीकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. .कृषी विद्या विभाग प्रमुख डॉ. प्रशांत शंकर बोडके व विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांना कुलगुरू शोध समितीने उमेदवारी नाकारल्याने वाद उफाळून आला आहे. कुलगुरुपदासाठी १२ शास्त्रज्ञांना उमेदवारीसाठी निवडण्यात आले आहे. सात नोव्हेंबरला यातून पाच जणांना कुलगुरुपदाची अंतिम उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे..MPKV Rahuri :" महात्मा फुले कृषी विद्यापीठ कुलगुरू निवड प्रक्रियेवर ‘बोट’.ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ससाणे यांनी शोध समितीचे समन्वयक अधिकारी डॉ. सरवणन यांना लेखी पत्र देत थेट न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. ‘‘मी ३० वर्षांपासून विद्यापीठाच्या सेवेत असून त्यातील १८ वर्षे प्राध्यापक पदावर कार्यरत आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत सध्याचा मी सर्वात सेवाज्येष्ठ कृषिशास्त्रज्ञ आहे. तसेच विस्तार शिक्षण संचालकपदाचा तसेच विभाग प्रमुख पदाचा माझा चार वर्षांचा अनुभव आहे..तरीही मला डावलण्यात आले आहे. याउलट मला दोन वर्षांनी कनिष्ठ असलेल्या डॉ. विठ्ठल शिर्के यांना कुलगुरुपदाच्या मुलाखतीसाठी निमंत्रित केले गेले. डॉ. शिर्के यांचा कृषी शिक्षण व संशोधन परिषदेतील दोन वर्षांचा संचालकपदाचा अनुभव गृहीत धरला गेला. मात्र, हे संचालकपद वैधानिक (स्टॅट्युटरी) नाही. या सर्व घडामोडींमधून कुलगुरू शोध निवड समितीचा पूर्वग्रहदूषित कारभार स्पष्ट होतो आहे..MPKV Rahuri: महात्मा फुले कृषी विद्यापीठाला पाच महिन्यांपासून मिळेना कुलगुरू.मला न्याय न मिळाल्यास मी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करेल; तसेच न्यायालयातदेखील दाद मागेल,’’ असे जळजळीत पत्र डॉ. ससाणे यांनी लिहिल्याचे समजते. दुसऱ्या बाजूला डॉ. बोडके यांनीही संतप्त होत समितीला पत्र लिहिले आहे. ‘निवड प्रक्रियेत अन्याय झाल्यास मी स्वस्थ बसणार नाही,’ अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे..मोहपात्रा, रस्तोगींच्या भूमिकेकडे लक्षसूत्रांच्या म्हणण्यानुसार, डॉ. शिर्के व डॉ. मिलिंद अहिरे या दोघांची सध्या विविध प्रकरणात चौकशी चालू आहे. त्यामुळे त्यांना कुलसचिव कार्यालयाने नाहरकत प्रमाणपत्रे दिलीच कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कुलगुरू शोध समितीचे सदस्य भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी महासंचालक डॉ. त्रिलोचन मोहपात्रा व कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी आता या प्रकरणात काय भूमिका घेतात, याकडे शास्त्रज्ञांचे लक्ष लागून आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.