Mumbai News: अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी नुकसानभरपाई देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा फोल ठरली आहे. मुख्यमंत्र्यांनी सुमारे ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलेले असताना मंगळवार (ता. २१) पर्यंत केवळ ५ हजार ८६६ कोटी ९६ लाख ४ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली. दिवाळसणातील लक्ष्मी पूजनाचा दिवस उलटला तरी केवळ ६३ लाख शेतकऱ्यांनाच मदत मिळालेली असल्याने उर्वरित शेतकऱ्यांची दिवाळी अंधार हटण्याची वाट बघण्यातच निघून जाणार आहे..राज्य सरकारच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यात ६८ लाख हेक्टर क्षेत्र बाधित आहे. त्यापैकी ४८ लाख ४१ हजार १५१ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ही मदत देण्यात आली आहे. वास्तविक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन हेक्टरच्या मर्यादेत मदतीची घोषणा केली होती. कोणत्याही अटी शर्थींशिवाय मदतीची केलेली घोषणा हवेत विरली असून तुकड्या तुकड्यांनी मिळणारी मदत आता शेतकऱ्यांना दिवाळीनंतरच मिळणार आहे. सलग सुट्या आणि रखडलेले पंचनामे यांमुळे मदतीला वेळ लागत आहे. .Ativrushti Madat: शेतकऱ्यांना ६४८ कोटी रुपये मिळणार; २३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी मदत मंजूर .अतिवृष्टी बाधितांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे जाहीर केले होते. पण राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या (एनडीआरएफ) निकषात दोन हेक्टरची मर्यादा असल्यामुळे आजवर अतिवृष्टी बाधितांना मिळालेली मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत होती. वास्तविक राज्य सरकारकडे निधीचा तुटवडा असल्याने केंद्र सरकारने प्रतिपूर्तीच्या रूपात निधी दिल्यानंतर आता उर्वरित एक हेक्टरची मदत जाहीर करण्यात आली आहे..त्यामुळे आता उर्वरित एका हेक्टरला मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आपत्ती आणि पुनर्वसन विभागाने सोमवारी उशिरा शासन निर्णय प्रसिद्ध केला असून,नवे लेखाशीर्ष उघडण्यात आले आहे..Ativrushti Madat: सप्टेंबरमधील नुकसानीसाठीची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा; विरोधकांची टीका.यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत केलेल्या ज्या शेतकऱ्यांचे बाधित क्षेत्र तीन हेक्टरपर्यंत असेल, अशा शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून ६४८ कोटी, १५ लाख ४१ हजार रुपयांच्या वितरणास मान्यता दिली आहे. अतिवृष्टी व महापुराने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून एकूण ८ हजार १३९ कोटी रुपये वितरित केल्याचा दावा मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी केला आहे..सहा लाख शेतकऱ्यांना मदतपॅकेज जाहीर केल्यानंतर आतापर्यंत राज्यातील ६ लाख १२ हजार १७७ शेतकऱ्यांचे तीन हेक्टरवर क्षेत्र बाधित होऊनही त्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत मिळाली होती. या शेतकऱ्यांचे ६ लाख, ५६ हजार ३१० हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे..पॅकेज जाहीर झाल्यानंतर शासन आदेशांनुसारमिळालेली मदत (शेतकरी व रुपये)तारीख शेतकरी संख्या मदत१८ ऑक्टोबर ३३ लाख ६५ हजार ५४४ ३ हजार २५८ कोटी ५६ लाख ४७ हजार१७ ऑक्टोबर ८८ हजार ६४९ १२३ कोटी ४४ लाख ५७ हजार१५ ऑक्टोबर ६ लाख ७२ हजार ८६६ ४८० कोटी ३७ लाख१६ ऑक्टोबर २१ लाख ६६ हजार १९८ १३५६ कोटी ३० लाख २२ हजार२० ऑक्टोबर ६ लाख १२ हजार १७७ वाढीव १ हेक्टरसाठी ६४८ कोटी १५ लाख ४१ हजार एकूण : शेतकरी ६२ लाख ९२ हजार २५७ एकूण मदत : ५८६६ कोटी ९७ लाख ४ हजार यंदाच्या खरिपात मदत : ८१३९ कोटी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.