Pune News: जुन्नर शहरासह पश्चिम आदिवासी भागात आणि नारायणगाव परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. जवळपास दीड तासाहून अधिक काळ झालेल्या पावसाने नागरिकांची धांदल उडाली. काढणीस आलेल्या भात पिकासह, द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाले. .जुन्नर शहरात सकाळपासून नागरिक असह्य उकाड्याने त्रस्त झाले होते. मंगळवारी (ता. २१) दुपारी तीनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. दीड तासाहून अधिक काळ चाललेल्या पावसाने शहरातील बाजारपेठेत दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या साहित्य खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची मात्र तारांबळ उडाली होती..Monsoon Rain Update: ढगाळ हवामानासह पावसाचा अंदाज; राज्यात पावसाचा जोर पुढील ५ दिवस कमीच राहणार.जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागातील सुराळे, आपटाळे, केळी, माणकेश्वर, माणिकडोह, केवाडी, देवळे या परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती भात उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सध्या भात पीक निसविण्याच्या अवस्थेत असून, मुसळधार व वादळी पावसामुळे भात पीक आडवे झाल्याचे दिसून येत आहे. तर या पावसामुळे भात पिकाचे नुकसान होऊन हातातोंडाशी आलेला घास हिरवण्याची भीती उत्पादक व्यक्त करत आहेत..दरम्यान, नारायणगाव परिसरात दुपारी सुमारे पंधरा ते वीस मिनिटे ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. मागील पाच दिवसात तिसऱ्यांदा पाऊस झाला आहे. सततच्या पावसामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. १५ ऑक्टोबर व १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सलग दोन दिवस दुपारी तीन ते साडेतीन च्या सुमारास सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतर दोन दिवस पावसाने उघडी दिली होती. .सूर्यप्रकाशही पडला होता.मंगळवारी (ता.२१) सकाळपासून उकाडा जाणवत होता. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ढगांचा गडगडाट व सोसाट्याचा वाऱ्यासह सुमारे वीस मिनिटे मुसळधार पाऊस झाला. मागील पाच दिवसात तिसऱ्यांदा झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी मात्र मेटाकुटीला आला आहे..Nanded Heavy Rainfall: नांदेडला पुन्हा जोरदार पाऊस.लोणावळ्यात नागरिकांची तारांबळलोणावळा : अचानक आलेल्या पावसाने लोणावळा शहरासह परिसरातील नागरिकांची तारांबळ उडाली आहे. मे महिन्यापासून सुरू असलेल्या मोसमी पावसाने नागरिकांना अगोदरच नको केले आहे. त्यात ऑक्टोबरमध्ये पावसाने थोडी उसंत घेतली असताना मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पावसाने अचानक हजेरी लावली. सुमारे तासभर पडलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत नागरिकांना धावाधाव करावी लागली. फटाका व्यावसायिक तसेच लक्ष्मी पूजन असल्याने लोणावळ्यातील बाजारपेठेत व रस्त्यावर बसलेल्या किरकोळ विक्रेत्यांना पावसाचा फटका बसला..शेतकऱ्यांची चिंता वाढली...सध्या तालुक्यात द्राक्ष बागांची ऑक्टोबर छाटणी व छाटणी नंतरची मशागतीची कामे, फूल तोडणी हंगाम, सोयाबीनची काढणी व मळणी, रब्बी हंगामाची तयारी, कांदा रोप तयार करणे आदी कामे सुरू आहेत. पावसामुळे शेती मशागतीच्या कामात खंड पडत आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून चिंता वाढली आहे. हंगामातील कांदा लागवडीच्या पूर्वनियोजनासाठी शेतकऱ्यांनी १५ ते २० दिवसांपूर्वी कांदा रोप तयार करण्यासाठी शेतात बियाणे टाकले आहे. वाफे तयार केले आहेत. पावसामुळे कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.मागील पाच महिने सुरू असलेला पाऊस कधी थांबतो या प्रतीक्षेत शेतकरी वर्ग आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.