Crop Loan Agrowon
ताज्या बातम्या

Crop Loan : रब्बीत पीककर्ज वाटपाला अद्याप प्रतीक्षा

जिल्ह्यात चालू रब्बी हंगामासाठी ५६३ कोटी ८१ लाख रुपयांचे पीककर्ज शेतकऱ्यांना वाटप करण्याचे उदिष्ट्य बँकांना देण्यात आले आहे.

टीम ॲग्रोवन

नांदेड : जिल्ह्यात चालू रब्बी हंगामासाठी (Rabbi Season) ५६३ कोटी ८१ लाख रुपयांचे पीककर्ज शेतकऱ्यांना (Farmer Crop Loan) वाटप करण्याचे उदिष्ट्य बँकांना देण्यात आले आहे. परंतु या बँकांनी अद्याप पीककर्ज (Crop Loan Bank) वाटपाला सुरुवात केली नसल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्ह्यातील शे‍तकऱ्यांना खरीप हंगामासाठी एक हजार ५८१ कोटी तर रब्बी हंगामात ५६३ कोटी ८० लाख असे एकूण दोन हजार १४४ कोटींचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट प्रशासनाने २८ बँकांच्या वेगवेगळ्या शाखांना दिले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा स्तरीय

बँकर्स कमिटीच्या बैठकीत शेतकऱ्यांना वेळेत कर्ज देण्याची सूचना दिली होती. यानुसार खरीप हंगामात ता. ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ९४.३७ टक्क्यांनुसार एक लाख ९४ हजार ७९२ शेतकऱ्यांना एक हजार ९४७ कोटी ९२ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. यानंतर (ता.१) आक्टोबरपासून रब्बीसाठी पीककर्ज वाटप करण्याचे काम सुरू होणे अपेक्षित होते. परंतु अद्याप रब्बीतील पीककर्ज वाटपाला सुरुवात झाली नाही.

रब्बीमध्ये ५६३ कोटी ८१ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले आहे. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून रब्बीसाठी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले नसल्याची, माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल कचके यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Issue: पूल नसल्यामुळे गावात येईना वाहन; शेतीमालाची करता येईना विक्री

Farmer Demand: केळीची विना परवाना खरेदी, खरेदीदारांची मनमानी बंद करा

Hydroponics Farming: कमी जागेत होणारी पाण्यावरची हायड्रोपोनिक्स शेती

Fertilizer Price Issue: नायगावमध्ये रासायनिक खतांची अधिकच्या दराने विक्री

Geo Tagging Inspection: पथकाकडून विमा संरक्षित बागांची पाहणी

SCROLL FOR NEXT