Rabi Sowing
Rabi Sowing  Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Sowing : आजऱ्यात रब्बीचे क्षेत्र घटणार

टीम ॲग्रोवन

आजरा, जि. कोल्हापूर ः तालुक्यात रब्बी पिकाचे क्षेत्र (Rabi Sowing Acreage) घटणार आहे. यंदा २५ हेक्टरने क्षेत्र घटेल, अशी शक्यता आहे. गेल्या वर्षी १९० हेक्टर क्षेत्रावर रब्बीची लागवड (Rabi Cultivation) झाली होती. यंदा १६५ हेक्टर होणार आहे. वन्यप्राण्यांचा वाढता त्रास, ऊस क्षेत्रात (sugarcane Acreage) होणारी वाढ व यंदा पावसामुळे लांबलेला पेरणीचा हंगाम, यामुळे रब्बीचे क्षेत्र घटल्याचे कृषी विभागातून (Agriculture Department) सांगण्यात आले.

तालुक्यात साधारणतः खरिपाची कापणी झाल्यावर रब्बी पिकांची लागवड होत होती. ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत लागवड होत होती. यंदा परतीचा पाऊस नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत राहिल्याने सुगीचा हंगाम लांबला. त्यामुळे खरीप पिकांची कापणी १५ दिवस पुढे ढकलली गेली. त्यामुळे २० ते २५ दिवसांनी रब्बीचा हंगाम पुढे ढकलला गेला.

जमिनीला वापसा आला नसल्याने रब्बी पिकांची पेरणी वेळेवर झाली नाही. अजूनही रब्बी पिकांची पेरणी होत आहे. यंदा हरभरा १००, ज्वारी २५, गहू ५, मसूर १५, वाटाणा ५, कांदा १५ हेक्टर अशी १६५ हेक्टरवर रब्बी पिकाची लागवड होईल. गेल्या वर्षी १२५ हेक्टरवर हरभरा पिकाची लागवड झाली होती. यंदा २५ हेक्टरने लागवड कमी होईल. हरभऱ्याच्या दिग्विजय या जातीच्या बियाण्यांचे, मसुरीचेही वाटप केले.

हरभरा व मसूर यांचे प्रायोगिक तत्त्वावर प्लॉट केले जातील. लाकूडवाडी, सुळे, हांदेवाडी, कोळिंद्रे, भादवण, भादवणवाडी, मडिलगे, उत्तूर, मुमेवाडी, बहिरेवाडी, धामणे, बेलेवाडी, झुलपेवाडी, आरदाळ, पेंढारवाडी यासह काही गावांत रब्बी पिकाची लागवड सुरू आहे. बहिरेवाडी येथे कांद्याची १५ हेक्टरवर लागवड केली जाते. उन्हाळी पीक भुईमूग याची लागवड देवकांडगाव, हरपवडे, कोरीवडे, पेरणोली, साळगावमध्ये सुरू आहे.

उसाखालील क्षेत्र वाढणार

तालुक्यात २५ वर्षांपूर्वी रब्बीचे सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्र होते. बदलते हवामान, जंगली जनावरांचा त्रास, वाढते ऊस क्षेत्र यामुळे ते घटत गेल्याचे दिसते. यंदा तालुक्यात ऊस क्षेत्र सुमारे पाच हजार ७०० हेक्टरपर्यंत जाऊन सुमारे ८०० हेक्टर वाढ होण्याचा अंदाज आहे. हत्ती, गवे, वनगाई यांसह वानर, मोर व लांडोर यांचा उपद्रव शेतीत वाढला. त्यामुळे शेतकरी रब्बी पीक घेण्यास उत्सुक नाहीत. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व विविध सूचना मिळूनही रब्बी पिकाखालचे क्षेत्र वाढलेले नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT