Women Self Help Group  Agrowon
ताज्या बातम्या

Women Self Help Group : महीला बचत गट उत्पादनांच्या ‘ब्रँडिंग’साठी डीपीसीतून तरतूद करू

जिल्हा नियोजन भवन आवारात महिला बचत गटांनी तृणधान्यपासून केलेल्या खाद्यपदार्थांचे प्रदर्शनाला नुकतीच पालकमंत्री विखे पाटील यांनी भेट दिली.

Team Agrowon

सोलापूर : संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य (Millets) वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे महिला बचत गटांनी (Women Self Help Group) तृणधान्यपासून केलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलच्या माध्यमातून तृणधान्य पिकांतील (Millet Crop) पोषणमूल्ये व त्यांचे मानवी आहारातील महत्त्व जनमाणसांत पोहोचण्यास मदत होईल.

त्यासाठी बचत गटांच्या उत्पादनाचे ब्रँडिग होणे आवश्यक आहे. जिल्हा नियोजन समितीतून त्यासाठी आर्थिक तरतूद करू, अशी ग्वाही महसूल, तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी येथे दिली.

जिल्हा नियोजन भवन आवारात महिला बचत गटांनी तृणधान्यपासून केलेल्या खाद्यपदार्थांचे प्रदर्शनाला नुकतीच पालकमंत्री विखे पाटील यांनी भेट दिली. त्याप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे आदीसह उपस्थित होते.

पालकमंत्र्यांच्या हस्ते ट्रॅक्टरचे वितरण

कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले.

यामध्ये उत्तम साठे, किसन साठे, अभिजित मनसावले, श्रीमती वैशाली सरवळे यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. तसेच नव्याने ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी दत्तात्रय कोंडीबा दोडतले (औज- आहेरवाडी), शशिकला लाळसंगे पूर्वसंमती पत्रवाटप करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lumpy Skin Disease: राज्यात ‘लम्पी स्कीन’ पुन्हा डोके वर काढतोय

Jan Suraksha Bill: ‘जनसुरक्षा’ दोन्ही सभागृहांत मंजूर

Animal Husbandry Status: पशुपालनाला आता कृषी समकक्ष दर्जा

Cotton Mission 2030: देश कापूस क्षेत्रात २०३० पर्यंत स्वयंपूर्ण करणार

Soyabean Oil Price: सोयातेलाच्या भावात ३० टक्क्यांनी वाढ

SCROLL FOR NEXT