women Empowerment : महिला बचत गटांचा उद्योजक गट करण्याची गरज
भंडारा : महिला बचत गट (Women Self Help Group) सबलीकरणासोबत महिलांच्या व्यवसाय व वृद्धिकरिता बचत गटांना उद्योजक गट करणे काळाची गरज आहे.
बचत गटातील महिलांना जास्त उत्पन्न मिळावे यासाठी त्यांना उद्योग कसे करावे याबाबत प्रशिक्षण देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाने (Women Economic Development Corporation) प्रयत्न करावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या सभा कक्षात आयोजित नवतेजस्विनी महाराष्ट्र महिला व उद्योग विकास प्रकल्पांतर्गत जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत श्री. कुर्तकोटी बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुरसुंगे, महिला आर्थिक विकास मंडळाचे प्रदीप काठोळे आदी उपस्थित होते.
भंडारा जिल्ह्यामध्ये उपजीविका विकास घटकाअंतर्गत महिला शेतीपूरक व्यवसाय सोबतच दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. जिल्ह्यातील महिलांमध्ये उद्योगाबाबत तसेच उद्योजक होण्याबाबत प्रचंड उत्साह आहे.
काही ठिकाणी महिलांनी नवीन उद्योग सुरू करून त्याची ब्रँडिंग व मार्केटिंग केली आहे. याच धरतीवर जिल्ह्यातील उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना भांडवल उपलब्ध करून दिल्यास त्याही मोठ्या प्रमाणात यश संपादित करू शकतात.
तेव्हा त्यांना सर्वतोपरी मदत करण्याच्या मानसिकतेतून सर्व विभागांनी प्रयत्न करावे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.