Agricultural Electricity
Agricultural Electricity Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Electricity : शेतीला पूर्णवेळ मोफत वीज देऊन खुशाल खासगीकरण करा

Team Agrowon

नांदेड : ‘‘सध्या राज्य सरकार महावितरण व महापारेषण या सरकारी कंपन्यांचे खासगीकरण (Electricity Board Privatization) करत आहे. या खासगीकरणास संभाजी ब्रिगेडचा (Sambhaji Brigade) विरोधच आहे. तरीही सरकारचे आडमुठे धोरण असेल तर शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज (Free Electricity) द्या आणि खुशाल खासगीकरण करा,’’ अशी मागणी संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे यांनी केली.

एसबीआय बँकेचे खासगीकरण होणार, या बातमीने कर्मचाऱ्यांच्या मुजोरीला कंटाळलेले बँकेचे ग्राहक कर्मचाऱ्यांच्या विरोधात व खासगीकरणाच्या बाजूने बोलू लागले.

तशीच आज महावितरणच्या लोकांनी शेतकऱ्यांची सहानुभूती गमावलेली आहे. शेतीसाठीच्या डीपीवरील काम जरी करायचे असले तरी शेतकऱ्यांना सर्व सामान आणायला लावतात. ते बसविण्यासाठी पैसे मागतात.

डीपी जळाला तर शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांनी छळ मांडला. देशाला स्वस्तात अन्नधान्य पुरवणाऱ्या शेतकऱ्याला सवलतीत वीज देण्याच्या नावाखाली सरकारने हजारो कोटी सबसिडी देऊनही शेतकऱ्यांच्या दारात जाऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी वसुली सुरू केली. म्हणून आज सर्वसामान्य शेतकरी या लोकांच्या विरोधात आहेत. शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेतला पाहिजे.

याच वेळी सरकारला कोंडीत पकडायला पाहिजे. कारण शेतीला लागणारी वीज खासगी लोकांच्या हातात दिली तर ते शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यांचे दरही परवडणारे नाहीत.

सरकारला महावितरणचे खासगीकरण करायचे असेल तर शेतीला चोवीस तास पूर्ण दाबाने वीज मोफत द्यावी. तरच संभाजी ब्रिगेडचा खासगीकरणास पाठिंबा असेल, असे गव्हाणे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Farmer Issue : मेगारिचार्ज योजनेसह केळीचे प्रश्‍न प्रलंबित

Water Scarcity : पाण्याच्या आशेने करमाळ्यात विहिरींची खोदाई

Sharad Joshi : शरद जोशींचा अंगारमळा लवकरच इतिहास जमा होईल...

Kharif Season : खते, बी-बियाणे वेळेत उपलब्ध करा

Crop Insurance : केळी विमाधारक वादळात नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित

SCROLL FOR NEXT