Onion Rate Agrowon
ताज्या बातम्या

Onion Rate : कांद्याच्या माळा घालून उद्यापासून आंदोलन

धोर्डे यांच्या माहितीनुसार सद्यःस्थितीत बाजारात येत असलेला कांदा हा खरिपातील कांदा आहे. दुसरीकडे साधारणतः १५ मार्चनंतर रब्बीतील कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येणे सुरू होईल.

Team Agrowon

Onion Market Rate छत्रपती संभाजीनगर : कांद्याचे पडलेले दर (Onion Rate) यावरून निर्माण झालेला प्रश्न आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

सरकारच्या शेतकरी विरोधी आयात-निर्यात धोरणाच्या (Import Export Policy) निषेध तसेच कांद्याचे पडलेले दर यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान लक्षात घेऊन सोमवारपासून (ता. ६) कांद्याच्या माळा घालून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी नेते धनंजय धोर्डे यांनी दिली.

धोर्डे यांच्या माहितीनुसार सद्यःस्थितीत बाजारात येत असलेला कांदा हा खरिपातील कांदा आहे. दुसरीकडे साधारणतः १५ मार्चनंतर रब्बीतील कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येणे सुरू होईल.

आधीच दर पडलेले असताना नव्याने येणाऱ्या कांद्याच्या खरेदी दरावरही त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजच्या घडीला बाजारात आलेला लाल व रांगडा कांदा तसेच रब्बी कांद्याचे पीक अद्याप शेतातच असतानाच कांद्याच्या भावात झालेली घसरण कांदा उत्पादकासाठी धोक्याची घंटा आहे.

यंदा वैजापूर तालुक्यात आमच्या परिसरात उसाऐवजी शेतकऱ्यांनी कांदा पिकाला मोठी पसंती दिली आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड तणावाखाली आला आहे.

दुसरीकडे सत्ता संघर्षात गुंतलेल्या राज्यकर्त्यांचे शेतकऱ्यांवर ओढावलेल्या संकटाकडे लक्ष नाही. जगभर कांद्याला चांगली मागणी असताना कांदा निर्यातीला चालना देण्याऐवजी शेतकऱ्यांना डुबवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न चालू आहेत.

त्यामुळे सरकारच्या शेतकरी विरोधी उदासीन धोरणाच्या निषेधार्थ सोमवारपासून (ता. ६) होळी सणाचे औचित्य साधून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात होणार आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी स्वतःच्या गळ्यात, घरादाराला व दुकानांना तसेच आपापली मोटरसायकल, ट्रॅक्टर इत्यादी साधने तसेच सरकारी बसेस व रेल्वे तसेच सरकारी कार्यालयाला कांद्याच्या माळा घालून सरकारचे लक्ष वेधण्याचे आंदोलन छेडण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आला आहे. होळीच्या दिवशी आपापल्या तहसील कार्यालयाला कांद्याच्या माळा अर्पण करून निषेध नोंदवावा, असे आवाहन धोर्डे यांनी कळविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT