Dhananjay Munde  Agrowon
ताज्या बातम्या

Chemical Fertilizer : बीड जिल्ह्यात रासायनिक खताचा संरक्षित साठा केला खुला

Team Agrowon

Beed News : जिल्ह्यात युरिया आणि डीएपी या रासायनिक खताचे २ हजार ३९१ टन संरक्षित साठा नुकताच खुला करण्यात आला. त्यामुळे पावसाच्या लहरीपणात अचानक पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना खत मिळण्यात अडचण येणार नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

यंदा जिल्ह्यात पावसाचा लहरीपणा अनुभवाला येत आहे. जवळपास ७ लाख ४० हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी उरकली आहे.

जवळपास १८ मंडलांत तर पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. पावसाचे प्रमाण असे लहरी असल्याने खताच्या उचल बाबतही हात आखडता घेतला गेला आहे. परंतु काही भागांत अचानक पडणाऱ्या पावसामुळे खताच्या मागणीत वाढ होते आणि उपलब्धता मात्र होत नाही त्यावर तोडगा म्हणून जिल्हा संनियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील संरक्षित युरिया व डीएपी साठ्या पैकी काहीसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनीही कृषी विभागाला शेतकऱ्यांना अपेक्षित खते मिळण्यात अडचण येऊ नये याची खबरदारी घेण्याची सूचना दिली होती. जिल्हा संनियंत्रण समिती अध्यक्षा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनीही याप्रकरणी लक्ष घातले. समितीच्या बैठकीत युरिया व डीएपीचा संरक्षित साठा स्टॉक खुला करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी मांडला.

त्याला मान्यता देताना १ हजार १८७ टन युरिया (११९ ट्रक) व १ हजार २०४ मे टन डीएपी (१२० ट्रक) खत मिळून एकूण २ हजार ३९१ टन म्हणजे आसपास २३९ ट्रक रासायनिक खत साठा खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जिल्ह्यातील सर्व कृषी अधिकारी कोठे पुरवठा करायचा हे ठरविण्यात आले. त्यानुसार विविध तालुक्यांत संरक्षित, मात्र खुला केलेल्या युरिया व डीएपी खत साठ्यापैकी खताची उचल सुरू असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

तालुकानिहाय खुला केलेला संरक्षित साठा (टनांमध्ये)

तालुका युरिया डीएपी

बीड १५० १५०

पाटोदा १४९ १४९

आष्टी २१९.९५ २२९.९५

शिरूर ९२.७ ११०

माजलगाव ७० ७०

गेवराई १३० १३०

धारूर ५० ५०

वडवणी ३५ ३५

अंबाजोगाई ९० ९०

केज १२५ १२५

परळी ७५ ७५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Serious Issues of Rape : लैंगिकतेचे शमन की दमन?

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

SCROLL FOR NEXT