‘Rohyo’ farms include plastic lining 
ताज्या बातम्या

Farm Pond Lining : प्लॅस्टिक फिल्मचा पुरवठा करण्यासाठी प्रस्ताव मागवले

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान आणि राष्ट्रीय कृषी विकास अभियानांतर्गत सामूहिक शेततळे, वैयक्तिक अस्तरीकरण घटकांतर्गत प्लॅस्टिक फिल्म पुरवठा करणाऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे.

टीम ॲग्रोवन

बुलडाणा : एकात्मिक फलोत्पादन (Horticulture) विकास अभियान आणि राष्ट्रीय कृषी विकास अभियानांतर्गत सामूहिक शेततळे (Farm Pond), वैयक्तिक अस्तरीकरण (Lining) घटकांतर्गत प्लॅस्टिक फिल्म पुरवठा करणाऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे.

यासाठी कृषी विभागाच्या योजनांतर्गत शेततळे अस्तरीकरण व सामूहिक शेततळे घटकांकरिता प्लॅस्टिक फिल्मचा पुरवठा करणाऱ्या वितरक, विक्रेता यांच्याकडून प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहे.

प्लॅस्टिक फिल्मचा पुरवठा करणाऱ्या वितरक, विक्रेत्यांची नोंदणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे करावयाची आहे. ज्या उत्पादक कंपन्या राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाकडे राज्यस्तरीय नोंदणी करता पात्र असतील, अशा कंपन्यांची वितरक म्हणून नोंदणी करता येईल.

कार्यालयामार्फत निर्गमित होणारी परिपत्रक आदेश कृतिपत्रक सुधारित सूचनांचा अवलंब करणे अनिवार्य राहील. जिल्हा स्तरावरील वितरण नोंदणी अर्ज फोटोसह प्रपत्र, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या नावे दोन लाख रुपयांची बँकेची स्टॅम्प पेपरवरील मूळ गॅरंटी, एक झेरॉक्स प्रत. वितरकांचे १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोंदणीच्या अटींबाबत करारनामा तसेच इतर कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT