Sugarcane Production Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Production : यंदाचा गळीत हंगाम लांबणीवर? १ नोव्हेबरला सुरू करण्याच्या हालचाली

Sugarcane Farmer : राज्यात सर्वाधित उत्पादन घेणाऱ्या ऊस पिकावरही याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Drought Conditions : राज्यात यंदा दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस नसल्याने अनेक पिकांचे उत्पादन घटण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान राज्यात सर्वाधित उत्पादन घेणाऱ्या ऊस पिकावरही याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

यंदाच्या गळीत हंगामात जवळपास १५ लाख टनांनी उसाचे उत्पादन घटण्याची भिती आहे. यामुळे यंदाचा गळीत हंगाम १५ ऑक्टोबर ऐवजी १ नोव्हेबर सुरू करण्याबाबत विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबर यांनी मत व्यक्त केले.

राज्यात सध्या सोलापूर, पुणे, नगर, नाशिकसह मराठवाडा व खान्देशातील ऊस पट्ट्यात दुष्काळाच्या झळा गडद झाल्याने परिस्थिती अत्यंत बिकट आहे. या भागात गुऱ्हाळे आणि खांडसरी १५ ऑक्टोबरपासून सुरू होतात. त्यामुळे यंदाचा गळीत हंगाम दिवळीपूर्वी म्हणजेच १ नोव्हेंबरपासून सुरू करावा, असे मत वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी व्यक्त केले.

राज्यातील अनेक भागात पावसाचे प्रमाण फारच कमी, तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी बऱ्यापैकी अशी स्थिती आहे. त्यामुळे उसाचे प्रति हेक्टरी उत्पादन घटण्याची भिती तज्ज्ञांनी दिली आहे. साखर उताऱ्यावरही त्याचा परिणाम होणार आहे.

प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्याचा वरदायी असलेला उजनी प्रकल्प व मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्प दहा-बारा टक्क्यांपर्यंतसुद्धा भरला नसल्याने पिकांना पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यामुळे उसाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे.

परिणामी, राज्यातील उसाचे उत्पादन १५ ते २० टक्क्यांनी घटणार आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी १० ते १५ दिवस गाळप हंगाम सुरू केल्यास ऊसतोडणी, ओढणी यंत्रणा कारखान्यांकडे तीन- चार दिवस आधी हजर होण्यास सुरुवात होते. असे मत ठोंबरे यांनी मांडले.

दीपावलीनंतर कारखाने सुरू केल्यास संपूर्ण तोडणी, ओढणी यंत्रणा हजर होण्यास २० ते २५ नोव्हेंबर उजाडेल व गाळप हंगाम सुरळीत सुरू होण्यात अडचणी येतील. कर्नाटकातही गाळप हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरू होत असल्याने महाराष्ट्रातील ऊस कर्नाटकात जाण्याचा धोका संभवत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bihar Election Exit Polls 2025: 'एनडीए'ला बहुमत?, 'महागठबंधन'ला किती जागा?, 'PK'ची जादू चालली नाही, एक्झिट पोल्सचे आकडे काय सांगतात?

PM Kisan Update: कधी मिळणार पीएम किसानचा २१वा हप्ता...

Citrus Farming: संत्रा काढणीतील काळजी म्हणजे गुणवत्तेची खात्री

Kharif Prices Crash: स्वतःच्या राज्यात भाव नाही; शेजारील राज्यात जाऊन शेतमाल विक्री, मग अटक अन् माल जप्त...

Agriculture Department Logo: कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण  

SCROLL FOR NEXT