Farmers Protest  Agrowon
ताज्या बातम्या

Farmers Protest : प्रकल्‍पबाधित शेतकऱ्यांचे अलिबागमध्ये उपोषण

Land Acquisition : चेहेर, मिठेखार, वाघूळवाडी, नवीन चेहर, साळाव, निडी या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी सीकॉमकरिता महाराष्ट्र शासनाने संपादन केल्‍या.

Team Agrowon

Alibaug News : मुरूड तालुक्यातील जेएसडब्ल्यू कंपनीसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या कंपनीने मान्य केलेल्‍या नाहीत. त्‍यामुळे जमिनी परत मिळाव्यात यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

चेहेर, मिठेखार, वाघूळवाडी, नवीन चेहर, साळाव, निडी या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी सीकॉमकरिता महाराष्ट्र शासनाने संपादन केल्‍या. भाडेपट्ट्याने घेतलेल्या जमिनीवर १९८९ मध्ये ग्रासिम इंडस्ट्रीज यांचा विक्रम इस्पात हा प्रकल्प वेलस्पन मॅक्सस्टील लिमिटेड यांनी विकत घेतला.

त्‍यानंतर हा कारखाना साळाव येथील जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड या कंपनीने अधिग्रहित केला. सुरुवातीला वेलस्पन व जमीन मालक शेतकरी यांच्यामध्ये २०१० मध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता, कारखानदाराने करारातील अटींचे वारंवार उल्लंघन करीत शेतकऱ्यांवर अन्याय केला.

त्‍यामुळे अधिग्रहीत केलेल्या जमिनी परत कराव्यात, या मुख्य मागण्यांसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी समन्वय संघर्ष समितीच्या माध्यमातून बुधवारपासून जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले आहे.

उपोषणास बसणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून संतोष ठाकूर, ॲड. सिद्धार्थ इंगळे, अॅड. विनायक शेडगे, अजय चवरकर, शैलेश कोंडस्टकर, अॅड. विकास गवळी, अॅड. मनमीत पाटील आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT