Soybean Production Agrowon
ताज्या बातम्या

Soybean Productivity : सोयाबीनची हेक्टरी १५ क्विंटल ४२ किलो उत्पादकता प्रस्तावित

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत येत्या खरीप हंगामात प्रस्तावित करण्यात आलेल्या सोयाबीनच्या क्षेत्रातून हेक्‍टरी १५ क्विंटल ४२ किलो उत्पादकता प्रस्तावित करण्यात आली आहे.

Team Agrowon

Soybean Market Update मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत येत्या खरीप हंगामात प्रस्तावित करण्यात आलेल्या सोयाबीनच्या (Soybean) क्षेत्रातून हेक्‍टरी १५ क्विंटल ४२ किलो उत्पादकता प्रस्तावित करण्यात आली आहे. दुसरीकडे कपाशीचे हेक्टरी २ क्विंटल ९० किलो रुईची उत्पादकता प्रस्तावित करण्यात आली असल्याची माहिती कृषी विभागाकडून (Agriculture Department) देण्यात आली.

येत्या खरीप हंगामासाठी नुकतीच विभागीय आढावा बैठक घेऊन कृषी मंत्राच्या उपस्थितीत नियोजन सादर करण्यात आले. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत वहितीखालील ५४ लाख ७६ हजार हेक्‍टर क्षेत्रापैकी खरिपाचे क्षेत्र ४७ लाख ८७ हजार हेक्‍टर आहे. येत्या खरीप हंगामासाठी ४८ लाख ४० हजार हेक्‍टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे.

प्रस्तावित करण्यात आलेल्या एकूण पीकनिहाय क्षेत्रापैकी उडीद सोयाबीन कपाशी कारळ आधी पीक क्षेत्रात किंचित घट पुणे कृषी विभागाला अपेक्षित आहे.

दुसरीकडे प्रस्तावित एकूण क्षेत्रापैकी ४९ टक्के क्षेत्रावर सोयाबीन, तर २८ टक्के क्षेत्रावर कपाशी १ टक्का क्षेत्रावर खरीप ज्वारी, दोन टक्के क्षेत्रावर बाजरी, ५ टक्के क्षेत्रावर मका, ९ टक्के क्षेत्रावर तूर प्रत्येकी तीन टक्के क्षेत्रावर मूग व उडीद पेरणी होणे अपेक्षित असल्याचेही कृषी विभागाने कळविले आहे.

पीकनिहाय प्रस्तावित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

खरीप ज्वारी ६४ हजार ३१५

बाजरी ७४ हजार ७५८

मका २ लाख ३० हजार ९९३

तूर ४ लाख ४३ हजार ५४२

मूग १ लाख २९ हजार ३१४

उडीद १ लाख २७ हजार ३३४

भुईमूग १३ हजार ७५१

सोयाबीन २४ लाख १६ हजार ३१८

कपाशी १३ लाख ९१ हजार २७९

तीळ २ हजार १५७

कारळ ४ हजार ०६६

सूर्यफूल ७१४

प्रस्तावित हेक्टरी उत्पादकता

खरीप ज्वारी ६ क्विंटल ६७ किलो

बाजरी ११ क्विंटल ९३ किलो

मका २९ क्विंटल ७९ किलो

तूर ८ क्विंटल ८५ किलो

मूग ६ क्विंटल ८२ किलो

उडीद ६ क्विंटल ९६ किलो

भुईमूग १० क्विंटल ६४ किलो

सोयाबीन १५ क्विंटल ४२ किलो

कापूस (रुई) २ क्विंटल ९० किलो

तीळ २ क्विंटल २० किलो

कारळ २ क्विंटल १५ किलो

सूर्यफूल २ क्विंटल ६२ किलो

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT