Cotton Sowing  Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Sowing : कपाशीच्या सघन लागवडीतून उत्पादकता वाढ

Cotton Cultivation : देशाचे लागवड क्षेत्र अधिक असले तरी कापसाची हेक्‍टरी उत्पादकता मात्र सर्वात कमी आहे.

Team Agrowon

Nagpur News : देशाचे लागवड क्षेत्र अधिक असले तरी कापसाची हेक्‍टरी उत्पादकता मात्र सर्वात कमी आहे. त्या पार्श्‍वभूमीवर उत्पादकतेत वाढीसाठी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने उथळ आणि हलक्‍या जमिनीसाठी सघन कपाशी लागवड प्रणालीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय.जी. प्रसाद यांनी केले.

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत आयोजित खरीप लागवडपूर्व प्रशिक्षण आणि शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

डॉ. प्रसाद म्हणाले, की मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी तंत्रशुद्ध व्यवस्थापन गरजेचे आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी प्रयत्नांवर भर द्यावा. पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन हे यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.

कापसाच्या हेक्‍टरी उत्पादकता वाढीचे सद्यःस्थितीत मोठे आव्हान आहे. त्या आव्हानाचा सामना करण्यात सघन कापूस लागवडीचे मोठे योगदान राहणार आहे. अनुसूचित जाती विकास कृती आराखडा अंतर्गत आयोजित केलेल्या या कार्यक्रमात डॉ. जयंत मेश्राम यांनी उपक्रमांचा आढावा सादर केला.

आगामी पीक हंगामात सर्वोत्तम पध्दतीचा अवलंब करण्यासाठी सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बॅटरीवर चालणारे नॅपसॅक स्प्रेअर, भाजीपाला बियाणे कीट, कीड व्यवस्थापन किट, विद्राव्य खते, भाजीपाला बियाणे किट यांचे वितरण करण्यात आले.

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच माजी संचालक डॉ. सी.डी. मायी यांनी देखील या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. कपाशीची गुणवत्ता सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनी व्यवस्थापनावर लक्ष्य दिले पाहिजे. त्यासोबतच वेचणीच्यावेळी कापसात अधिक काडी कचरा येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: ...तर यंदा दुष्काळाचा सामना करावा लागला नसता : नितीन गडकरी

Post Harvest Technology: शेतीमाल प्रक्रिया, मूल्यवर्धनासाठी ‘आंतरराष्ट्रीय केंद्र’ उभारणार : पणनमंत्री जयकुमार रावल

Safflower Production: साताऱ्यातील अशोक लाड करडई उत्पादनात राज्यात प्रथम

Fodder Shortage: राज्यात चारा टंचाई टाळण्यासाठी परराज्यांत चारा पाठविण्यावर निर्बंध

Farmers Protest: उजनी प्रकल्पांविरोधात शेतकऱ्यांचा ‘रास्ता रोको’

SCROLL FOR NEXT