Cotton Sowing : उत्तर भारतातील कापूस लागवडीत १० टक्के वाढ

Cotton Market Update : देशात उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्ण झाली आहे. तेथे लागवडीत १० टक्के वाढ झाली असून, एकूण क्षेत्र सुमारे १७ लाख हेक्टरवर पोहोचले आहे.
Cotton sowing
Cotton sowingAgrowon

Jalgaon News : देशात उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्ण झाली आहे. तेथे लागवडीत १० टक्के वाढ झाली असून, एकूण क्षेत्र सुमारे १७ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. देशातील लागवडदेखील किंचित कमी राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र, तेलंगणा भागातील लागवड किंचित कमी होईल. गुजरातमध्ये मात्र लागवड दोन ते अडीच लाख हेक्टरने कमी होईल. तेथील लागवड २२ ते २३ लाख हेक्टरपर्यंत राहू शकते. महाराष्ट्रातील लागवड ४१ लाख हेक्टर एवढी अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील क्षेत्र सुमारे एक ते दीड लाख हेक्टरने कमी होईल.

राज्यात पूर्वहंगामी लागवडीबाबत अनेक भागात उत्साह नाही. कापूस बियाण्यांसंबंधी समाधानकारक स्थिती नाही. तसेच अनेक शेतकऱ्यांना समाधानकार दर मिळालेले नाहीत. सध्याची दरपातळी नीचांकी स्थितीत आहे. परंतु कापसाला पर्यायी चांगले पीक नाही. पावसाबाबत समाधानकार अंदाज आलेले नाहीत. यामुळे कापसाची लागवड किंचित कमी होईल, असे सांगितले जात आहे.

Cotton sowing
Cotton Market : आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात वाढ

उत्तरेकडे दरांबाबत होती समाधानकारक स्थिती

उत्तर भारतातील कापूस लागवड यंदा पंजाब व हरियानात अधिक आहे. तेथे कापसाचे दर सरासरी ८५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. तेथे १० लाख गाठींनी उत्पादन घटले. शेतकऱ्यांनी नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारीत कापसाची तेथे कमाल विक्री केली. यामुळे तेथे कापूस पिकाबाबत नाराजी नाही. सध्या तेथे अनेक शेतकऱ्यांचे पीक २५ ते ३५ दिवसांचे झाले आहे.

देशातील लागवड १२६ लाख हेक्टरवर

भारत जगात सर्वाधिक कापूस लागवड करणारा देश आहे. अमेरिका, चीन, पाकिस्तान, ब्राझीलचे मिळून जेवढे क्षेत्र असते त्यापेक्षा अधिक कापूस लागवड एकट्या भारतात केली जाते. मागील हंगामात देशात सुमारे १२९ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा ती १२६ ते १२७ हेक्टरवर होण्याचे संकेत आहेत.

Cotton sowing
Cotton Cultivation : एक जूनपूर्वी कापूस लागवडीच्या क्षेत्रांचे सर्वेक्षण

कापूस दरांवर दबाव

कापूस लागवडीचा हंगाम देशात सुरू आहे. यातच उत्पादन मागील वेळेस घटून २९८ लाख गाठी (एक गाठ १७० किलो रुई) एवढे अपेक्षित आहे. पण कापूसदर दबावात आहेत. वायदा बाजार ८७ सेंटवर स्थिर आहे. परंतु कापूसदर किंवा खंडीचे दर (३५६ किलो रुई) ५९ हजार रुपये आहेत. देशातील अनेक भागांत कापूसदर नीचांकी स्थितीत आहेत.

खानदेशात खेडा खरेदीत कापूस दर ७००० रुपये प्रतिक्विंटल आहेत. सरकी दर २८०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. तसेच निर्यात रखडत सुरू आहे. देशातून यंदा फक्त २० ते २२ लाख गाठींची निर्यात होऊ शकते. मागील वेळेस निर्यात ४५ लाख गाठी एवढी झाली होती. सरकी दरात सतत घसरण झाल्याने कापूस दर कमी झाल्याची माहिती मिळाली.

उत्तर भारतात कापूस लागवड घटण्याचे संकेत होते. परंतु तेलबीयांबाबत समाधानकारक स्थिती नाही. पावसाबाबतचे अंदाज इतर खरीप पिकांबाबत अनुकूल नसल्याने अनेकांनी कापूस लागवड केली. यामुळे किमान १० टक्के कापूस लागवड उत्तर भारतात वाढली आहे. पावसावरच पुढील कापूस बाजाराची चाल अवलंबून आहे. सध्या सुधारणांचे संकेत दिसत नाहीत.
- महेश शारदा, माजी अध्यक्ष, नॉर्थ इंडिया कॉटन असोसिएशन.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com