Pune APMC  Agrowon
ताज्या बातम्या

Private APMC In Maharashtra : राज्यातील खासगी बाजार समित्यांचे होणार मूल्यमापन

Farmer News Maharashtra : शेतीमालाच्या खरेदी-विक्रीच्या पारंपरिक बाजार समितीच्या व्यवस्थेत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या फसवणुकीला पायंबद घालण्यासाठी शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या खासगी बाजार समित्यांमध्येही शेतीमालाला अधिकचा दर मिळत नसल्याचे समोर आले आहे.

Team Agrowon

Pune News : शेतीमालाच्या खरेदी-विक्रीच्या पारंपरिक बाजार समितीच्या व्यवस्थेत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या फसवणुकीला पायंबद घालण्यासाठी शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या खासगी बाजार समित्यांमध्येही शेतीमालाला अधिकचा दर मिळत नसल्याचे समोर आले आहे.

यामुळे राज्यातील खासगी बाजार समित्यांच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्यासाठी पणन विभागाने माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.

या समितीने राज्यातील खासगी बाजार समित्यांचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत. फळे भाजीपाला नियमनमुक्तीसह, थेट पणनसह खासगी बाजार समित्यांच्या उभारणीला कायद्यान्वये मान्यता देण्यात आली.

त्यामुळे राज्यात सुमारे ८० खासगी बाजार समित्या उभारण्यात आल्या. मात्र या बाजार समित्यांचा शेतीमालास अधिकचा बाजारभाव मिळण्यासाठी फारसा उपयोग झाला नसल्याचे शासनाचे मत झाले आहे.

यामुळे खासगी बाजार समित्यांचे कामकाज कसे चालते, शेतमालाची खरेदी-विक्री पारदर्शी पद्धतीने होती का? खुल्या लिलावाद्वारे स्पर्धात्मक दर मिळतो का? आदी सर्व कामकाजाची पाहणी समितीने करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

समितीमध्ये पणन संचालक, पणन सहसचिव सुग्रीव धपाटे, माजी पणन संचालक सुनील पवार, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक, बाजार समिती संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पणन सहसंचालक, माजी कृषी संचालक जयवंत महल्ले, शेतकरी सदस्य उदय देवळाणकर (छत्रपती संभाजीनगर), रमेश शिंदे (नाशिक) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

२००५ नंतर पारंपरिक बाजार व्यवस्थेला पर्याय म्हणून केंद्र सरकारने मॉडेल ॲक्ट आणला. या माध्यमातून खासगी बाजार, थेट पणन परवाना, भाजीपाला नियमनमुक्ती आदी पर्यायांचा अवलंब करण्यात आला. मॉडेल ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी महाराष्ट्रात झाली. आता १८ वर्षांनंतर पर्यायी व्यवस्थांचा कितपत फायदा शेतकऱ्यांना झाला हे पडताळून पाहण्याची वेळ आली आहे. त्यानुसार शासनाने समिती स्थापन केली आहे.
- सुनील पवार, माजी पणन संचालक आणि समिती सदस्य

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Startup Policy: स्टार्ट अप : संधी अन् आव्हाने

Agriculture Success Story: नाशिकच्या मातीत घेतले ‘ॲव्होकॅडो’चे यशस्वी उत्पादन

Alephata Onion Rate: आळेफाटा येथील उपबाजारात कांदा प्रति क्विंटलला १६०० रुपये

Fruit Crop Subsidy: ड्रॅगन फ्रूट, पॅशन फ्रूट, स्ट्रॉबेरी लागवडीसाठी अनुदान

Bhigwan Farmers Meet: ऊस-दूध परिषद शनिवारी भिगवणला : रघुनाथ पाटील

SCROLL FOR NEXT