Mushroom Farming: आईच्या प्रेरणेतून साकारलेला मशरूम उद्योग
Rural Entrepreneur: भंडारा जिल्ह्यातील अतिदुर्गम बामणी (चौरास) येथील अनंत इखार यांनी एमएस्सी गणित पूर्ण करूनही कृषी आधारित उद्योजकता निवडली. आईच्या प्रेरणेने सुरू केलेल्या धिंगरी अळिंबी उत्पादन व्यवसायात त्यांनी शेतकरी आणि कंपन्यांचे मजबूत नेटवर्क तयार केले असून, वर्षाला ४० लाखांहून अधिक ताज्या आणि सुक्या मशरूमची विक्री करून उल्लेखनीय यश मिळवले आहे.