Indian Co-operative Congress : स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहकार चळवळीचे अनन्य साधारण योगदान राहिले आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार क्षेत्रातील सर्व प्रकारचे रोख व्यवहार बंद करून टाकण्याचे आवाहन केले आहे. दिल्ली येथील प्रगती मैदान येथे १७ वी भारतीय सहकार काँग्रेस पार पडली. यावेळी संबोधित करताना मोदी यांनी हे आवाहन केले आहे.
केंद्र सरकारच्या सर्व योजना यशस्वी करण्यासाठी सहकाराच्या क्षमतेबाबत मला अजिबात शंका नसल्याचेही मोदी म्हणाले. सहकार चळवळीने स्वातंत्र्याच्या आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्याचे सांगत मोदी यांनी सहकार क्षेत्राला आवाहन केले की, आगामी काळात या क्षेत्रातील सर्व प्रकारचे रोखीचे व्यवहार बंद केले पाहिजेत.
आज जगात भारत डिजिटल व्यवहारांसाठी ओळखला जात आहे. सहकारी संस्था आणि सहकारी बँकानाही यामध्ये पुढाकार घ्यावा लागणार आहे, असे मोदी म्हणाले. को-ऑपरेटिव्ह सोसायट्यांच्या डिजिटलीकरणाबाबत बोलताना मोदी म्हणाले की, मी माझे काम केले आहे. आता को-ऑपरेटिव्ह सोसायट्यांनी डिजिटलाईज होत माझे एक काम करावे. सर्व प्रकारच्या व्यवहारातून रोखीचे व्यवहारांना संपवून बंद केले पाहिजेत, असे मोदी म्हणाले.
६० हजार अमृत सरोवर
आपल्या संबोधनादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी देशात अमृत सरोवर बनवण्यावर भर दिला. यावेळी मोदी यांनी देशात बांधण्यात आलेल्या अमृत सरोवरांची आकडेवारी सांगितली. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात ७५ अमृत सरोवरांची निर्मिती करण्याचे आवाहन मोदी यांनी केले होते. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत देशभरात सुमारे ६० हजार अमृत सरोवरांची निर्मिती करण्यात आल्याचे मोदी म्हणाले.
कॉर्पोरेटच्या सुविधा
ज्याप्रमाणे कॉर्पोरेट क्षेत्राला सुविधा आणि व्यासपीठ उपलब्ध करून दिली जात आहेत, त्याप्रमाणे आज सहकार क्षेत्रालाही सुविधा दिल्या जात आहेत. सहकारी संस्थांची ताकद वाढविण्यासाठी कराचे दरही कमी करण्यात आले आहेत.
वर्षानुवर्षे प्रलंबित असणारे सहकार क्षेत्राशी निगडित प्रश्न जलदगतीने मार्गी लावले जात आहेत. याशिवाय आमच्या सरकारने सहकारी बँकांनाही मजबूत केल्याचे मोदी म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.