Sindkhedraja News  Agrowon
ताज्या बातम्या

Sindkhed Raja News : सिंदखेडराजा ऐतिहासिक वास्तूचा विकास आराखडा तयार करा

Sindkhed Raja Latest Update : मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Sudhir Mungantiwar : बुलडाणा ः सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ (Rajmata Jijau) यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी तेथील ऐतिहासिक वास्तूंचे महत्त्व लक्षात घेत सर्वंकष बृहत्आ राखडा तयार करावा.

जिल्हास्तरीय समितीने विविध विभागांशी चर्चा करून विविध विकासकामांचा अंतर्भाव असलेला परिपूर्ण विकास आराखडा राज्यस्तरीय समितीकडे पाठवावा, असे निर्देश राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिले.

सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक वास्तूंच्या विकासासंदर्भात सोमवारी (ता. १०) श्री. मुनगंटीवार यांनी बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते. आमदार राजेंद्र शिंगणे, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे,पुरातत्त्व संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांच्यासह बुलडाणा विविध अधिकारी या वेळी उपस्थित होते.

मुनगंटीवार म्हणाले, की सिंदखेडराजा येथे सहा राज्य संरक्षित स्मारके आणि पाच केंद्र शासन संरक्षित स्मारके अथवा ठिकाणे आहेत. यामधे राजे लखुजी जाधव राजवाडा, निळकंठेश्‍वर मंदिर, राजमाता जिजाऊ जन्मस्थळ, सावकार वाडा, रंगमहाल, काळा कोट, मोती तलाव, रामेश्‍वर मंदिर, चांदणी तलाव, सजना बारव आदी ठिकाणांचा समावेश आहे.

या स्थळांसह परिसर विकासाच्या बाबतीत एकत्रित विचार करण्याची आवश्यकता आहे. या स्थळांचे महत्त्व लक्षात घेतच कामांचे नियोजन होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक यंत्रणांची बैठक घेऊन कार्यवाहीच्या सूचना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Eknath Shinde Meets PM Modi: एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, PM मोदींची घेतली भेट, म्हणाले, 'महायुती'नं असा निर्णय घेतलाय...

Watermelon Cultivation : खानदेशात कलिंगड लागवड सुरू

Cucumber Price: काकडीला उठाव; तसेच काय आहेत सोयाबीन, केळी, कोथिंबीर आणि बाजरीचे आजचे बाजारभाव

Crop Loan : पीककर्ज वसुली बंद होईना

Agrowon Podcast: कोथिंबीरचा भाव टिकून, सोयाबीनचा भाव दबावातच, केळीची आवक टिकून, बाजरी नरमली तर काकडीला उठाव

SCROLL FOR NEXT