Bharat Jodo Yatra  Agrowon
ताज्या बातम्या

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांच्या शेगाव सभेची तयारी जोरात

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा शेगावमध्ये येत असून शुक्रवारी (ता.१८) त्यांची राज्यातील दुसरी जाहीर सभा होणार आहे.

टीम अॅग्रोवन.

शेगाव, जि. बुलडाणा : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) शेगावमध्ये येत असून शुक्रवारी (ता.१८) त्यांची राज्यातील दुसरी जाहीर सभा होणार आहे. सभेला चार ते पाच लाख जनसमुदाय उपस्थित राहील, असे नियोजन केले जात असून यादृष्टीने तयारीसाठी राज्यातील काँग्रेसचे बडे (Congress Leader) नेते येथे तळ ठोकून आहेत.

शुक्रवारी (ता.१८) दुपारी चार वाजता ही सभा होणार आहे. यासाठी शेगाव-बाळापूर मार्गावर सुमारे २५ एकरांवर सभेसाठी व्यवस्था केली जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आव्हाड यांनी सभास्थळाची पाहणी करून बंदोबस्त, व्यासपीठ, वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला.

दुसरीकडे काँग्रेसने बाळासाहेब थोरात, माजीमंत्री यशोमती ठाकूर, हर्षवर्धन सपकाळ व इतर प्रमुख नेते सातत्याने शेगावमध्ये सभेच्या तयारीसाठी भेटी देत आहेत. जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी विविध समित्यांचे गठण करीत तयारीला वेग दिला. सभेच्या अनुषंगाने शेगाव शहरात बॅनर, झेंडे लावले असून काँग्रेसमय वातावरण बनवण्यात येत आहे.

राहुल वारकऱ्यांसोबत खेळणार पावली

राहुल गांधी शेगावमध्ये मुक्काम करणार आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यान जिल्ह्यातील वरखेड फाट्यावर वारकरी संप्रदायातर्फे गोल रिंगण केले जात आहे. यात राहुल गांधी हे सुद्धा सहभागी होऊन पावली खेळतील. तसेच संत गजानन महाराज संस्थानमध्ये जात ते ‘श्रीं’च्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. सभेच्या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमही यानिमित्ताने आयोजित केले जाणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Shortage : खत टंचाईवरून कर्नाटकच्या विधानसभेत गोंधळ; एकेरी उल्लेख करत सत्ताधारी व विरोधक भिडले

MGNREGA Wages : पैसे द्या, पैसे द्या… ‘कुशल’चे पैसे द्या

Agriculture Electricity : शेतीपंपासाठी सिंगल फेज वीजपुरवठा वापरू नये

Orange Orchard : बुरशीजन्य देठसुकी, फांदी मर, फळगळ व्यवस्थापन

Agriculture Scheme: केंद्र सरकारकडून ठिबक, तुषार सिंचनासाठी मिळणार ५५ टक्क्यांपर्यंत अनुदान

SCROLL FOR NEXT