Sindhudurga News : जिल्ह्यात शनिवार (ता. १०) पहाटेपासून मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली असून सर्व जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
मॉन्सूनचे ८ जूनला केरळमध्ये आगमन झाले. त्यानंतर जिल्हावासीयांना मॉन्सूनची प्रतीक्षा लागली आहे. जिल्ह्यात शुक्रवार (ता. ९) सायकांळपासून ढगाळ वातावरण तयार झाले होते. रात्री उशिरा थंड वारे सुरू झाले.
कोणत्याही क्षणी पाऊस पडेल असे वातावरण तयार झाले होते. दरम्यान पहाटे पाच वाजता जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, कणकवली आणि वैभववाडी तालुक्यांच्या सर्व भागांत पावसाच्या सरी पडल्या.
अर्धा एक तासाच्या फरकाने पावसाच्या सरी कोसळत होत्या. काही भागांत विजांचा कडकडाटदेखील झाला. कणकवलीच्या काही भागांत दमदार सरी पडल्या. जिल्ह्यात सर्वत्र दुपारपर्यंत पावसाच्या सरी पडत होत्या. सर्वत्र पावसाळी वातावरण तयार झाले आहे.
पावसाच्या सरींमुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. हा मॉन्सूनचा पाऊस नसला तरी मॉन्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. काही शेतकऱ्यांनी भात रोपवाटिका तयार करण्याच्या कामाला सुरुवात देखील केली आहे.
समुद्राला उधाण
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपॉरजॉय चक्रीवादळाचा किनारपट्टी भागात परिणाम दिसून येत आहे. समुद्राला उधाण आले असून मोठ्या लाटा किनाऱ्याला धडकत आहेत. आणखी दोन ते तीन दिवस समुद्र खवळलेला राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.