Satara Agriculture Electricity News : कृषिपंपधारकांना (Agricultural Pumps) शासनाचे अनुदान देऊन एक रुपये १६ पैसे प्रतियुनिट दराने वीजबिल (Electricity bill) आकारणी करावी, या मागणीचे निवेदन आमदार बाळासाहेब पाटील यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दिले. यावेळी श्री. पवार यांनी निवेदन हातात घेऊन तत्काळ ऊर्जा विभागाचे सचिव ए. बी. शुक्ला यांच्यासोबत फोनद्वारे संवाद साधून संबंधित वीज दरवाढ रोखून पूर्वीप्रमाणे सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्याबाबत सूचना दिल्या.
विरोधी पक्षनेते श्री. पवार सोमवारी (ता.८) कोरेगाव (जि.सातारा) दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली.
तेथे आमदार बाळासाहेब पाटील यांनी अजित पवार यांना वीजदर वाढीबाबतचे निवेदन दिले. यावेळी आमदार मकरंद पाटील उपस्थित होते.
महाराष्ट्रातील कृषिपंपधारक व सहकारी पाणीपुरवठा संस्थांना महावितरणचा एचटी व एलटी वीजपुरवठा सुरू आहे. मार्च २०२३ अखेर महाराष्ट्र शासनामार्फत कृषिपंपासाठी सवलत योजना लागू करून सहकारी पाणीपुरवठा संस्थांना १ रुपये १६ पैसे प्रति युनिट व इतर कृषिपंपधारकांना १ रुपये प्रति युनिट दराने बिले आकारणी केली जात होती.
सदरची सर्व वीज बिले सहकारी पाणीपुरवठा संस्था दरमहा नियमित सवलत दराने भरत होत्या.
सध्या महावितरणने राज्य शासनास कृषी पंपधारकांच्या अनुदानाच्या रकमेबाबत चर्चा, पत्रव्यवहार न करता अचानकपणे एप्रिल, २०२३ पासून संपूर्ण कृषिपंपधारकांना ५ रुपये २६ पैसे प्रति युनिट व वहन आकार ६० पैसे प्रति युनिटसह ५ रुपये ८६ पैसे प्रति युनिटने वीजबिल आकारणीस सुरुवात केली आहे.
सदरची दरवाढ ही न परवडणारी असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. याचा विचार करून कृषिपंपधारकांना अनुदान देऊन १ रुपये १६ पैसे प्रति युनिटप्रमाणे वीज बिल आकारणी करावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.